सावळदबारा येथे रंगनाथ काळे(नानासो) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप 

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शिवाजी विद्यालयात प्रभारी सरपंच मो.आरिफ मो.लुखमान व प्रा.जीवन कोलते पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद अधिकारी उपस्थित होते.माजी जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप अजिंठा शिक्षण सस्थाचे अध्यक्ष तथा औरंगाबाद जि. प. अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी विद्यालयात येथील शाळेत विध्याथ्र्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.तसेच सावळदबारा ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप करीत वाढदिवस साजरा केला.यावेळी प्रा.जिवन कोलते (सामाजिक कार्यकर्ते),राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सावळदबारा अध्यक्ष मो.आरिफ मो.लुखमान,वसंता चोरमारे, रवींद्र गायकवाड (मोलखेडा), सोयगाव तालुका अध्यक्ष डॉ.इंद्रजित साळुंखे, शहरप्रमुख रवींद्र काळे, उपप्राचार्य शिरीष पवार, कुरपटवार निलेश गाडेकर, दीपक देशमुख,कृष्णा जुनघरे, अजय नेरपगारे, डॉ. आबीब, सुनील वानखेडे, चेतन वाकालकर, सुधाकर सोहनी, मुख्याध्यापक किरण पाटील, रविंद्र देशमुख, अनीस तडवी, आदिसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 3 7 4 9
Users Today : 7
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *