गजानन नगर प्रभात क्र.३ मध्ये घाणिचे साम्राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष

Khozmaster
2 Min Read
साफसफाई अभावी नाल्यांचे पाणी रस्त्यावर
देवेंद्र सिरसाट नागपूर
वानाडोंगरी नगर परिषद परिसरातील प्रभाग क्र.३ गजानन नगर येथे  सांडपाण्याची नाली व नियमित साफसफाई अभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असुन आजाराचा प्रकोप वाढल्याने त्रस्त नागरिकांनी त्वरित नाली बांधकामाची व साफसफाईची मागणी न.प. प्रशासनाकडे  निवेदनातून केली आहे.
गजानन नगर येथील शेवतकर चक्की असलेला हा रस्ता भरगच्च लोकवस्तीत असुन येथील नागरिकांचा ये-जा चा मुख्य रस्ता आहे. या रस्त्या वरून शाळेतील विधार्थी पायदल ये-जा करतात, आजारी लोकांना याच रस्त्यानी औषधोपचाराकरिता वस्ती बाहेर यांच रस्त्यानी जावे लागते. या रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या नालीची अनेक वर्षा पासुन साफसफाई व दुरुस्ती न झाल्याने नालीचे घाण पाणी रस्त्यावर येते आणि त्यामुळे सर्वत्र  डासांचा प्रकोप वाढल्याने हिवताप, मलेरिया,डेंगू , शर्दी, खोकला आदी सारख्या आजारांनी डोके वर काढले असुन नागरिकांमध्ये सर्वत्र भयाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नगर परिषद प्रशासनानी या ज्वलंत समस्याकडे जातीनी लक्ष घालून त्वरित नालीचे पक्के बांधकाम करून तुडूंब भरलेल्या नालीची व पसरलेल्या घाणीची सफाई करावी अशी मांगती वानाडोंगरी नगर परिषदकडे  निवेदनातून त्रस्त नागरिक
सौ.मंगलाताई शेवतकर,विजय गोडबोले,अभय पांडेय, विनय पांडेय,आर.के. सिंह, विलास नागपूरे, वैशालीदेवी मौर्य,शालीनी वैवटकर,श्रावणी वैवटकर,वंदना लुंगे, स्वर्णा गोस्वामी,राजरानी पटेल, श्रीकांत महंतों, विमलादेवी महंतों,एस आर परतेती,प्रमीला मोर्या,भारती वानखेड़े,माया पाटील,सोनाली, मनिषा दुरुगकर,राणी दुरूगकर,अमित समर्थ, पार्वती यादव,रेणू झाॅ, शोभा बावनगडे, गिता सोनेकर, चंद्रभान सोनेकर,सुरज चवडे,ए राय, सुखदेव लुंगे, अशोक शेवतकर, अब्दुल शेख, सतीश डिग्रसे,सरला आवारे,गिता पाठक, वैजयंती माला, सुरेश लोथे,दया शर्मा,राजु भगत,विजय वाशिमकर आदीनी केली आहे. या समस्याच्या निराकरना बाबत ग्रामस्थांनी अनेकदा निवेदन देवूनही प्रशासन दुर्लक्ष करित असल्याने नागरिक चागलेच संतापले असुन प्रशासनाच्या विरोधात कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरू शकते असे चित्र दिसत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *