नगर परिषद समोर निदर्शने..
देवेंद्र सिरसाट नागपूर
बुटीबोरी येथील हनुमान नगर वासीयांना ते राहत असलेल्या घराचे मालकी पट्टे देण्यात यावे, हनुमान नगर वसाहतीत नागरी सुविधा प्रदान करण्यात याव्या, बुटीबोरीतून हनुमान नगर कडे येण्याच्या रेल्वे मार्गावर फाटक लावण्यात यावे या मागण्यांना घेऊनआदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने आज बुटीबोरी नगर परिषदेसमोर निदर्शने करण्यात आली.मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात बुटीबोरी नगरपरिषदेने मालकी पट्ट्याचा ठराव मंजूर करूनही त्याचा पाठपुरावा केला नाही. या ठरावाचे अंतर्गत नगरपरिषदेने नमूद केल्यानुसार मालकी पट्टे न दिल्याने त्या भागात शासकीय योजना राबवता येत नाही असे स्पष्ट लिहिलेले आहे. यापूर्वी आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाच्या वतीने अनेकदा बुटीबोरी नगरपरिषदेला निवेदने देण्यात आली, आंदोलने करण्यात आली. परंतु अजूनही नगरपरिषद दखल घेत नसल्याने हनुमान नगर वाशी यांचे प्रचंड गर्दी निदर्शनाचे दरम्यान दिसून आली.
निदर्शनाला आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचे संयोजक अमोल धुर्वे, कैलास मडावी अशोक आत्राम यांनी संबोधित केले. अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष अरुण लाटकर यांनी निदर्शकांना संबोधित करताना भारतीय संविधान एका बाजूला अधिकार प्रदान करत असताना नगरपरिषद मात्र गरीब श्रीमंत भेदभाव करीत असल्याचा आरोप केला.निदर्शनाचे अंती हनुमान नगर मधील कार्यकर्ते कैलास मडावी यांच्या नेतृत्वाखाली दहा सदस्यीय प्रतिनिधी मंडळांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री राजेंद्र चिखलखुंदे व अध्यक्ष बबलू गौतम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावर मुख्याधिकाऱ्यांनी याच आठवड्यात हनुमान नगर भागाची पाहणी करून विकासाची कामे समोर मिळण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले.आजच्या कार्यक्रमात पुरुषोत्तम पाजरे, मारुती नेवारे, आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक कमलाकर अवचट, आई बहुउद्देशीय संस्थेचे संयोजक संजय घुमरकर, कोयतुर गोंडवाना महासभेचे पंजाब पुरके यांनी कार्यक्रमाच्या समर्थनार्थ आपली वक्तव्य केली
तर हनुमान नगर भागातून 200 च्या वर कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते.