बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी मोबाईल मध्ये व्यस्त तर ग्राहक त्रस्त

Khozmaster
3 Min Read
मुर्तिजापुर
शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये सततच रोष असतो. ग्राहकांच्या समस्यांचे बँक कर्मचाऱ्यांना काही घेणे-देणे नाही. याबाबतचे ताजे चित्र पहावयास मिळाले आहे. पैसे काढण्याच्या काऊंअरवर ग्राहक रांगेत उभे असतांना बँक कॅशियर चक्क आपल्या  मोबाईल वर गेम खेळतांना  छायाचित्रामध्ये दिसत आहे. तसे पाहता बँक ऑफ महाराष्ट्र च्या कर्मचाऱ्यांकडून व बँक मित्राकडून विनाकरण त्रास होत असल्याबाबत अनेक ग्राहकांनी मौखीक रित्या व लेखी स्वरुपात तक्रारी दिल्या आहेत. तसेच बँक पासबुक प्रिंट मशीन सुद्धा तब्येतीची वस्तू बनली आहे.मुर्तीजापुर शहरांमध्ये बँक मित्र म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा गैरवापर करून ग्राहकांकडून बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांचा बाबत त्यांना पैसे आकारल्या जात आहे. तसेच बँकेमध्ये आधार कार्ड सर्व कामांकरिता ग्राह्य धरल्या जाते परंतु या विपरीत बँक मित्र ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड इलेक्शन कार्ड आधार कार्ड मागतात याला काय समजावे ? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.खाते उघडण्याकरिता आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड यांची आवश्यकता आहे हे मान्य आहे परंतु ज्या ग्राहकांचे पहिलेच खाते असताना सुद्धा आधार कार्ड इलेक्शन कार्ड पॅन कार्ड यांची मागणी करून विनाकारण त्रास दिल्या जातो.नवीन खाते मग उघडण्याकरिता बँकेमध्ये कुठलाही दर लागत नाही परंतु बँक मित्र नवीन खाते उघडून देण्याचे सुद्धा पैसे घेतात याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे कारण की बऱ्याच ग्राहकांनी तोंडी तक्रार करून सुद्धा आज पर्यंत त्यांनी कुठलीही कारवाई केलेली नाहीये.दुय्यम खाते पुस्तकाचे सुद्धा बँक मित्र दर आकारतात.नावामध्ये दुरुस्ती करून देणे काही अडचण आल्यास बँकेमध्ये पाठवितात.ती अडचण घेऊन बँकेमध्ये  गेल्यास  बँकेतील  कर्मचारी  त्यांना  बँक  मित्राकडे  पाठविता असा विनाकारण त्रास देणे ग्राहकांना सुरू आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन सामान्य ग्राहकांना होणारा त्रासापासून मुक्त करणे गरजेचे असतांना ते सुध्दा याकडे जाणून-बुजून डोळेझाक करित आहे. विशेष बाब म्हणजे बँक मित्र आधार कार्ड वरूनच ग्राहकांना पैशांची देवाण-घेवाण करतात परंतु एखाद्याला जर तातडीने आवश्यकता असल्यास तो जर आधार कार्ड घेऊन बँकेमध्ये पैसे काढण्याकरिता गेला तर त्याला खाते पुस्तकाची मागणी करण्यात येते. याला काय म्हणावे. इकडे डिजिटल बँकिंग करा म्हणता आधार लिंक असले की तुमचे पेमेंट निघते अशा विविध प्रकारचे प्रलोभन दाखवून ग्राहकां ग्राहकांचे खाते उघडले जाते. नंतर त्यांना असा त्रास देतात.आश्चर्याची बाब म्हणजे मोठे व्यापारी ज्या ग्राहकांच्या मोठ्या ठेवी बँकेमध्ये आहे अशांना आतून काम करून दिल्या जाते. अशा प्रकारचे मनमानी व्यवहार मुर्तीजापुर शाखेमध्ये सुरू आहेत. बँक मित्रांकडून ग्राहकांच्या खाते मधील रकमेवर गदा येते याचे उदाहरण असे की केंद्र सरकार मार्फत राबविण्यात येणारे प्रधानमंत्री जीवनदायी विमा योजना चे अर्जांवर बँकेची प्रक्रिया सांगून ग्राहकांची स्वाक्षरी घेण्यात येते म्हणजे त्यांना सांगण्यात अशी येते की तुम्ही जिवंत आहे की मेले असे सांगण्यात येते गोरगरिबांना न सांगता त्यांचा विमा फॉर्म भरून त्यांच्या खात्यातील रक्कम डीबीटी पद्धतीने गहाळ करण्यात येते.  एक प्रकारचा सामान्य ग्राहकाचा हक्कांवर गदा आणण्यात आली आहे. त्यातच या मोबाईलवर गेम खेळणाऱ्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाने सामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अशा कर्मचाऱ्यांवर बँक काय कारवाई करते ? अशा प्रकारची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
0 9 3 7 5 3
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *