मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वर्ग सेवा देण्यास टाळाटाळ

Khozmaster
2 Min Read
प्रतिनिधी मूर्तिजापूर – शहरासह तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचा आरोग्यसेवेसाठी आधारवड असलेल्या निशुल्क सेवा देणाऱ्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
शासकीय नियमानुसार बाह्य रुग्ण तपासण्याची वेळ हि सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान सुरू व्हायला पाहीजे अशी माहिती सुत्राकडून मिळाली आहे परंतू प्रत्यक्षात असे होत नसल्याचे दिसत आहे आज दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान एक रुग्ण नियमानुसार नोंदणी करून आपल्याला असलेल्या आजाराची तपासणी करण्याकरिता तपासणी कक्ष्याकडे गेले असता बाह्यरुग्ण विभाग ,बालरोग तज्ञ विभाग व औषधी विभाग अशा विभागाला कुलुप लावले दिसून असल्याचे एका रुग्णांनी सांगितले त्यानंतर एका लहान बाळाला घेऊन आपले आई-वडील तपासणी करतात बालरोग तज्ञ च्या विभागाजवळ आले असता त्या ठिकाणी सदरचा कक्ष उघडा होता परंतु त्या ठिकाणी डॉक्टर हजर नसल्याचे त्या रुग्णांनी सांगितले व बालरोग तज्ञ डॉक्टर हे नेहमीच त्यांच्या कक्षात उपस्थीत नसल्याचे बोलल्या जात आहे अशावरून डॉक्टर हे सेवा देण्यास का टाळाटाळ करतात यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांसोबत अरेरावीची भाषा करतात व तुमच्याकडून जे होते ते करून घ्या आमचे कोणीही काही करू शकत नाही अशा भाषेत ते रुग्णांनासोबत बोलतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. एकीकडे खाजगी डॉक्टरांकडून रुग्नाची लुट होत असल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या आणि शासकीय सेवेतील डॉक्टरांचा असा सेवेतील कामचुकार पणा यादोन्ही गोष्टी वरून रुग्नांनी ” जगाव की मराव ” असा प्रश्न विचारला जात आहे आणि रुग्ण कल्याण समिती ही बोर्डावर लावण्यापूर्तीच मर्यादित आहे का समितीत असलेले सदस्य गण आणि लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात का गोरगरिबांचा वाली कोण असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असून जनसामान्यात चर्चेला फार मोठ्या प्रमाणात उधाण आले आहे.दवाखान्यातील कुणीही कर्मचारी वर्ग सेवा देण्यास टाळाटाळ किंवा कामचुकारपणा करत असल्याचे दिसून आले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल डॉ.विलास सोनोने ,वैद्यकीय अधीक्षक
उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर
0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *