प्रजासत्ताक दिनी वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा.

Khozmaster
7 Min Read
विद्यार्थ्यांची व शिक्षकांची कामगिरी कौतुकास्पद!
-प्रतिनीधी विशाल गवई- सावंगी गवळी:. २६ जानेवारी भारताचा राष्ट्रीय सन प्रजासत्ताक किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा केला जातो;हे आपणास ठावूकच आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी गवळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. पण कोरोनाकाळात गेली दोन वर्षापासून कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम झाला नव्हता. पण या वर्षी सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला.त्यातही आनंदावर विरजण पाडणारा आचार संहितेचा आदेश आला होता, तरीपण कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सुत्रसंचालनातून  सरळ करण्याचे काम येथील शिक्षक श्री संदीप पाटील सर यांनी केले. कोणत्याही परिस्थितीत आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी यावेळी घेतली गेली.संविधान वाचन व पौष्टिक तृणधान्य दिन साजरा.                                                         वार्षिक स्नेह्संमेलनाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक श्री गजेंद्र सदावर्ते सर यांच्या हस्ते ध्वजारोहनाने झाली. त्यानंतर संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सावंगी गवळीच्या सरपंच सौ.सविताताई शेजोळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.सुजाताताई शेजोळ, अंगणवाडी मधील सेविका मंगलाबाई शेजोळ, शारदाताई शेजोळ, व मदतनीस कमलबाई सपकाळ , वंदनाताई गवई, तसेच पोलीस पाटील सौ.गीताताई शेजोळ, व सावंगी गवळी च्या तलाठी सौ.मगर म्याडम. तसेच आशा सेविका सौ. सरलाताई शेजोळ आणि सर्व शिक्षकवृंद यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर प्रजासत्ताक दिनी संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत विद्यार्थ्यांना संविधान वाचन व पठन करण्यात आले. या सोबतच २६ जानेवारी रोजी पौष्टिक तृणधान्य दिन साजरा करावा हि सूचना सावंगी गवळीचे कृषी सेवक मा.एल. ए. सवळी यांनी दिली व किमान आठवड्यातून दोन दिवस तरी पौष्टिक तृणधाण्याचे सेवन करावे अशी शपथ विद्यार्थ्यांना व गावकर्यांना दिली.शिष्यवृत्ती व केंद्रीय क्रीडा स्पर्धामधील विजेता संघांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार                           तद्नंतर इयत्ता ५ वी मधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ या शिष्यवृत्तीत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्तीसाठी प्राप्त झालेले कुमारी योगिता लक्ष्मन शेजोळ व कुमार प्रतिक गजानन शेजोळ यांचा सत्कार शाळेचे शिक्षक श्री. सवडतकर सर व मुख्याध्यापक श्री. सदावर्ते सर यांनी शब्दकोश व प्रमाणपत्र देऊन केले. या सोबतच केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावंगी गवळी मधील मुलांच्या खो खो संघामधील ओम भानदास पोरे,सुमित  गजानन शेजोळ,प्रतिक शेजोळ,गोपाल भानापुरे, राहुल प्रविन शेजोळ, गणेश कांबळे, व आनंद मिलिंद जाधव यांचा सत्कार सावंगी  गवळीच्या तलाठी मा.वैशालीताई मगर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कबड्डी  व खो खो खेळातील उपविजेता ठरलेल्या मुलींच्या संघामध्ये स्नेहा कोरडे,पायल गायकवाड, हर्षदा कोरडे, पूनम शेजोळ, रिद्धी मोरे, पूनम तांगडे,श्रुती शेजोळ, व अश्विनी शेजोळ, यांचा सत्कार  अंगणवाडी सेविका मंगलाबाई शेजोळ व शारदाताई शेजोळ तसेच सावंगी गवळीचे कोतवाल श्री कडूबा भाऊ सपकाळ यांनी प्रमाणपत्र देऊन केला.
१०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावलेल्या कुमारी पायल गायकवाड चा सत्कार गावच्या पोलीस पाटील गीताताई शेजोळ यांनी केला.
गणवेश व  प्रोत्साहनपर बक्षीस वाटप.
                                दरवर्षी प्रजासत्ताक दिनी श्री नारायण शेजोळ पाटील त्यांचे धाकटे बंधू  स्व. दत्ताभाऊ शेजोळ पाटील यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शाळेतील गरीब विद्यार्थ्याला गणवेश वितरीत करतात. याही वर्षी त्यांनी शाळेतील २१ विद्यार्थ्यांना श्री हेमंत शेजोळ पाटील यांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले. तर सावंगी गवळीचे प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मन पडघाण यांनी शाळेतील सर्व मुलांना पेन प्रोत्साहनपर वाटप केले. यासोबतच माजी शिक्षक श्री रोकडे सर यांनी ह्यावर्षी पासून शाळेच्या विकासात्मक कामासाठी दरवर्षी ५००० रु. अनुदान स्वरुपात देण्याची जाहीर घोषणा केली.बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाची गावकर्यांना मेजवानी.
                                 मागील दोन वर्षापासून ताळेबंदी मुळे कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम साजरा झाला नव्हता.पण या वर्षी ह्या दोन्ही वर्षाचा मोबदला घेणारा बहारदार व उत्कृष्ट कलावंताचा संगम बघायला मिळाला. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात “ देवा श्री गणेशा” या गाण्यातून वर्ग ५वि ६वि व ७ वी मधील विद्यार्थ्यांनी केली. यासोबतच अंगणवाडीतील चिमुकल्यांचा निरागस अभिनय “ चंदा चमके चम चम” या सिनेगाण्यातून बघायला मिळाला. सोबत “ शेतकरी आत्महत्या” या नाटकामधून विद्यार्थ्यांनी “ दारूबंदी”, :ग्रामस्वच्छता अभियान” या बाबींचे महत्व पटवून देत शेतकरी पैश्याअभावी कशा प्रकारे आत्महत्या करित आहेत. याची जाणीव करून दिली.  सोबतच विविध सिनेगीतांवर डान्स करीत सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना कोतूक करण्यास  व बक्षीस देण्यास भाग पाडले.
                      सर्वात उत्कृष्ट व जिवंत अभिनय “ धडकन” चित्रपटातील” ‘दुल्ह्हे का सेहरा’ या सिनेगीतातून पहावयास मिळाला. ज्यात रिद्धी मोरे, व प्रतीक्षा शेजोळ यांनी दुल्हा व दुल्हन चे पात्र तर योगिता शेजोळ, प्राची शेजोळ,सृष्टी शेजोळ,लक्ष्मि कापसे,पूनम तांगडे, ह्या नवरीच्या मैत्रीणच्या वेशभूषेत दिसल्या. तसेच गणेश पोरे, ओम करडेल, गोपाल भानापुरे, प्रतिक शेजोळ,गणेश कांबळे, आशिष गवई व आनंद जाधव यांनी कव्वाली संघाची भूमिका साकारली होती. ह्या गाण्याचे चित्रीकरण इतके परिपूर्ण व जिवंत होते कि, सर्व प्रेक्षक वर्ग खरेखुरे लग्न असल्यासारखे नवरीला निरोप देण्यासाठी मंचकापर्यंत पोहचले, तर नवरी झालेल्या प्रतीक्षा शेजोळचे खरे वडील श्री शान्तिराम शेजोळ यांच्या डोळ्यात पाणी आले.
                   ह्या सर्व कार्यक्रमाची धुरा श्री संदीप पाटील सर यांनी सूत्रसंचालन करून साकारली तर शाळेचे मुख्याध्यापक श्री गजेंद्र सदावर्ते सर यांनी अध्यक्षपद भूषवले. अश्याप्रकारचा जिवंत सांस्कृतिक कार्यक्रम झाला नव्हता, आपण एक उत्कृष्ट उदाहरण आज घडवले त्या बद्दल आम्ही सर्व गावकर्यांच्या वतीने शाळेतील सर्व शिक्षक वृन्दांचे आभार व्यक्त करतो. ह्या शब्दात ग्रामपंचायत चे संगणक परिचालक  श्री रामेश्वर अंभोरे यांनी आभार प्रदर्शित  केले.
        सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा तसेच वार्षिक स्नेह संमेलनामध्ये इयत्ता ५ वी ते ७ वी मधील विद्यार्थी, शाळेचे कर्मचारी श्री प्रकाश गवई, सुनीताताई गवई, सोबतच गावातील श्री प्रकाश शेजोळ, रवींद्र कापसे, केशव शेजोळ, वैभव गवई, शुभम शेजोळ, मिलिंद जाधव, रामेश्वर शेजोळ, श्रीकृष्ण कोरडे, दत्ता थोरात. यांनी मेहनत घेतली.  व जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा सावंगी गवळी येथील शिक्षक वृंद  सदावर्ते सर,संदीप पाटील सर, दुकानदार सर,व सवडतकर सर व त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सावंगी गवळीच्या गावकर्यान्द्वारे कौतुक व वाहवाह केल्या जात आहे. व अविस्मरणीय असे स्नेह संमेलनाचे आयोजन केल्याबद्दल आभार मानल्या जात आहे.आणि असेच विविध कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केले जावे अशी अपेक्षा केली जात आहे.
0 9 3 7 8 1
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *