वृध्दांच्या सेवेसाठी सदैव तत्पर शिवाजीराव काळे चिखीली:- ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे राजेंद्र लहाने मित्रमंडळाच्यावतीने किराणा वाटप करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. गजानन डोंगरदिवे हे होते. प्रमुख मार्गदर्शक राजेद्र लहाने सामाजिक कार्यकर्ते हे होते, विषेश उपस्थीतीत शिवाजीराव काळे अध्यक्ष जगदंबा शिक्षण संस्था बुलडाणा तर प्रमुख पाहुणे सुनिल सालकुटे भावसार,
तुकाराम चव्हाण (लातुरकर), सुखदेव बोर्डे, प्रल्हाद कर्हाडे सामाजिक कार्यकर्ते हे होते.
राजेंद्र लहाने मित्रमंडळ वृध्दांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असुन वृध्दांची सेवा करण्यातच खर पुण्य आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लहाने यांनी तुकाराम आश्रय वृध्दाश्रम भोकर येथे किराणा वाटप करतांना केले. तसेच पदमश्री सिंधुताई सपकाळ यांचा आदर्श घेऊन वृध्दांची सेवा करणारे आश्रमास काहीच कमी पडणार नाही. असे मत जखदंबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवाजी काळे यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन सौ रुपाली डोंगरदिवे यांनी केले. यावेळी समाधान डोंगरदिवे, प्रियंका वानखडे, कावेरी डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, देऊबाई डोंगरदिवे यावृध्दाश्रमातिल वृध्दांसह ईतर उपस्थित होते.
राजेंद्र लहाने मित्रमंडळाच्या वतीने वृध्दाश्रमास किराणा वाटप
0
9
7
2
2
5
Users Today : 23
Leave a comment