सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील » परब्रम्ह परमेश्वर अवतार भगवान श्री चक्रधर स्वामी यांची दांडीपोणिॅमा निमित्ताने भव्य यात्रा असल्याने दि. ३ ते ७ फेब्रुवारी यात्रा आहे.
यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चक्रधर स्वामी यात्रेला भारत भरातून लाखो भाविक भक्त येणार असल्याचे गृहीत धरुन या ठिकाणी
तयारी सुरु आहे. पाच दिवस चालणाऱ्या दांडीपोणिॅमा यात्रेचा समारोप दि. ८ पर्यंत चालणार आहे. यात्रेचा या समारोप कार्यक्रमाला संत महत, भक्त, भाविक गण,यांची होणारी गर्दी लक्षात घेता सावळदबारा येणारा आठवडे बाजार दि. ५ फेब्रुवारीला आठवडे बाजार बंद ठेवण्या ची दवंडी येथील ग्राम पंचायतीने आज ठिक ठिकाणी दिलेली आहे.
अशी माहिती मो.आरिफ मो.लुखमान प्रभारी सरपंच सावळदबारा यांनी बोलताना सांगितले.
Users Today : 26