सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील फर्दापूर पोलिस ठाण्याचे वतीने ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मनीष कलवानिया पोलिस अधीक्षक औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी रक्तदान शिबिर व इतर तपासण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मनीष कलवानिया साहेब जिल्हा औरंगाबाद ग्रामीण, डॉ विजय कुमार मराठे पोलिस उप अधिक्षक सिल्लोड यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस स्टेशन फर्दापूर, सोयगांव, शांताई फाउंडेशन वाकोद व अजिंठा लेणी हस्तकला व्यावसायिक संघटना फर्दापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त
भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या शिबिरात
मोफत E.C.G. कार्डीओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आल्या पोलिस अंमलदार यांच्यासाठी वैद्यकीय चाचणी व निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोयगाव,सपोनि अनमोल केदार सोयगाव,सपोनि देवीदास वाघमोडे फर्दापूर, अंमलदार यांनी आपले रक्तदान केले.या शिबिर प्रसंगी रक्तदान करा,सतत सामाजिक जाणीव जागृत ठेवा, ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजावर आपण प्रेम केले पाहिजेत.कारण या समाजाने आपल्याला खूप काही दिलेले आहे आणि समाजाचे काहीतरी देणे आहे समजून दरवर्षी रक्तदान करा.असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विजयकुमार मराठे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे केले.यावेळी सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत,सपोनि अनमोल केदार व सोयगाव पोलीस ठाण्याचे व फर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच पोलीस मित्र रक्तदान शिबिरात सहभागी झाले होते.
Users Today : 26