औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील जामठी येथे माध्यमिक विद्यालयात २०२३ वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून दिन साजरा करण्यात आला.पौष्टिक तृणधान्ये २०२३ अंतर्गत सोयगाव तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक विद्यालयात पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्व आणि फायदे पटवून विद्यार्थीना व ग्रामस्थ मार्गदर्शन करण्यात आले.
सोयगाव कृषि विभागामार्फत विविध प्रकारच्या शेती विषयी माहिती देण्यात आली.
दरवर्षी राज्यात पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.विविध कार्यक्रमांसोबतच
तृणधान्य पिकांचे क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता वाढीसाठी कार्यक्रम हाती घेण्यात येऊन मंडळ अधिकारी फर्दापूर आ.जी.गुंडीले यांनी विद्यार्थ्यांना तृणधान्ये आहारातील सखोल अशे मार्गदर्शन केले.
आपल्याकडील गावामध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन,
तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांचे लागवड तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकापासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती आर.जी.गुंडीले मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांना सांगितले.यावेळी सरपंचपती विलास राठोड, उपसरपंच कृष्णा जाधव, शाळेचे मुख्याध्यापक पडघड, ग्रामसेवक संदीप सावंत, शिक्षकवृंद, विद्यार्थी, सोयगाव कृषी विभागाचे अतुल पाटील कृषी पर्यवेक्षक फर्दापूर, मानसिंग भोळे कृषी सहाय्यक, अर्जुन सुरडकर कृषी सहायक,प्रगतीशील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
▪️
गाव, तालुका, जिल्हा राज्य अशा सर्वच पातळ्यांवर विविध कृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.भरडधान्याचे उत्पादन क्षेत्र वाढविणे, प्रकिया व त्यांचे पोषणमूल्य लक्षात घेऊन आहारातील वापर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.ज्वारी,नागली,वरी या पिकाची उत्पादकता कमी असल्याने शेतकरी या पिकाची लागवड करीत नाही.त्यामुळे आहारातील वापर वाचल्यास मागणी वाढून सोयगाव तालुक्यातील शेतकरी आपोआप लागवडीकडे वळतील.
एस.जी.वाघ तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग सोयगाव
Users Today : 26