नाविन्यपूर्ण पिक लागवडीतून सावरखेडा व लेणापूर शिवारातील शेतकरी वर्गाने साधली प्रगती

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव कृषी विभागाच्या वतीने सोयगाव तालुक्यातील लेणापूर व सावरखेडा येथे प्रकल्प संचालक आत्मा औरंगाबाद बी.एस. तौर, प्रकल्प उपसंचालक आत्मा औरंगाबाद ए.ई.साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली रब्बी हंगाम सन २०२२-२०२३ मध्ये नाविन्यपूर्ण पिक म्हणून करडई पिकाचे प्रात्यक्षिके आत्मा अंतर्गत सोयगाव तालुक्यातील सावरखेडा व लेणापूर येथील शिवारात आयोजित करण्यात आलेले होते यात प्रामुख्याने नवीन पिकाची लागवड करून क्षेत्र वाढविणे, कमी खर्चात जास्त उत्पादन घेणे तसेच उत्पादकता वाढविणे हे उद्देश साध्य करण्यात येत आहे. सदरील गावात नाविन्यपूर्ण पिकाची लागवड योग्य वेळी झाल्याने अपेक्षित उत्पादन प्राप्त होत आहे त्यामुळे गावाचे सरपंच, उपसरपंच, लाभार्थी यांनी आत्मा व कृषि विभागाचे आभार व्यक्त केले आहेत.
0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *