अतिवृष्टीच्या व पिक विम्याच्या मदतन दिल्यास शेतकरी करणार उपोषण

Khozmaster
1 Min Read
  1. सतिश मवाळ

    लोणार :
    माहे ऑक्टोबर मध्ये सुलतानपूर मंडळात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन सह इतरत्र मालाची फार मोठे नुकसान झाले होते.व तसा पंचनामा तलाठी,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी केला होता त्या पंचनामाच्या याद्या त्यांनी तहसील कार्यालयात जमा सुद्धा केल्या होत्या.
    परंतु कृषी सहायक,ग्रामसेवक व तलाठी यांच्या आपसिवादामुळे सदर याद्यांचे काम हे अर्धवट स्वरूपात असल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या अतिवृष्टीचे व पीक विम्याचे शासनाकडून मिळणारे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत जमा न झाल्यामुळे लोणार तालुक्यातील वडगाव तेजन येथिल शेतकऱ्यांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी तहसीलदार लोणार यांना निवेदन देऊन सदर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा करावी अशी मागणी केली होती.
    या मागणीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे वडगाव तेजन येथील शेतकऱ्यांनी मागणी पूर्णत्वास न केल्यास दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पासून तहसील कार्यालय लोणार च्या समोर अमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी तहसीलदार सह कृषी अधिकारी,पोलीस स्टेशन व इतरत्र दिला आहे.
    या अर्जावर वडगाव तेजन येथिल पत्रकार विनोद पाटील तेजनकर सह डॉक्टर सुरेश हाडे,शिवाजी शिरसाठ,गुलाब लोंढे,पंढरी शिरसाठ,माणिक तेजनकर,सुभाष तेजनकर व अन्य फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.तरी संबंधित प्रकाराकडे तालुक्यातील संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *