चिखली : चिखली विधानसभा मतदारसंघातील अगोदरच्या लोकप्रतिनिधी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक गावे तहानलेली आहेत स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार साधे पिण्याचे पाणीही देऊ शकलेले नाही. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गाव हे पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी स्वयंपूर्ण असावी यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला . आताचे भाजपा शिवसेना युतीचे सरकार सुद्धा विकास कामांचा ध्यास घेऊन आपली वाटचाल करीत आहे. त्या अनुषंगाने चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जल जीवन मिशन योजनेअंतर्गत योजना मंजूर करून पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये गावे स्वयंपूर्ण करणार असुन कोणतेहि गाव आता तहानलेले असणार नसल्याचा आशावाद आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी खामखेड गोंधन खेड येथील पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन प्रसंगी व्यक्त केला.
दि 9/1/2023 रोजी खामखेड गोंधन खेड येथील 45 लक्ष रुपये किमतीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन सोहळा आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते पार पडला.
खामखेड गोंदणखेड या गावामध्ये मंजुर करण्यात आलेली कामे
आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने खामखेड गोंदणखेड या गावामध्ये जलजीवन मिशन नवीन पाणी पुरवठा योजना. ४५ लाख, २५१५ अंतर्गत रस्ता बांधकाम करणे ७ लक्ष ,आमदार निधी सभामंडप बांधकाम करणे. ७ लक्ष रू असे जवळपास ५९ लक्ष रू किमतीची कामांना मान्यता मिळवून घेतली आहे.
यावेळी डॉ कृष्णकुमार सपकाळ , विकास नाना डाळिंबकर जिल्हा कार्यकारणी सदस्य, एकनाथ भाऊ जाधव भाजप नेते, भास्कर आडळकर भाजप नेते , सरपंच काशिनाथ मोरे , सरपंच करणखेड सौ अनिता गायकवाड, अरुण पाटील तालुका उपाध्यक्ष भाजपा , लक्ष्मणराव शेळके तालुका उपाध्यक्ष भाजपा , समाधान पाटील शेळके , प्रवीण पाटील तालुका उपाध्यक्ष काँग्रेस ,गजानन पवार, आकाश सुरोशे उपसरपंच , विठ्ठल दादा गायकवाड अध्यक्ष वि का सोसायटी , बाळू काका पाटील भाजप नेते,सरपंच सौ अनिता गायकवाड , पंजाबराव पाटील , बलदेव पाटील , तानाजी ठेपले , एकनाथ शेजोल , केशवराव चिंचोले , अर्जुन गवळी काँग्रेस नेते , लक्ष्मण पाटील , राधा कापसे माजी प स सदस्या , सचिन गरड सदस्य ग्राम पंचायत ,ग्राम पंचायत सदस्य वनिताताई पाटील , ग्राम पंचायत सदस्य सौ मीना शेगावकर , सौ रूपाली प्रवीण पाटील,तानाजी ठेपले व असंख्य गावकरी उपस्थीत होते.
Users Today : 41