चिखली तालुक्यात येणाऱ्या आठ मार्च महिला दिनानिमित्त महिला व बाल विकास विभाग,बुलढाणा, सावजी मॅटर्निटी हॉस्पिटल,चिखली, गणराज्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित माता महाआरोग्य संवाद”हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम श्री.विष्णू आव्हाळे यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास जात आहे. *जागर स्त्री अधिकारांचा ! जागर स्त्री आरोग्याचा !* या उक्तीप्रमाणे समाजातील सर्व महिलांचे आरोग्य सुरक्षित व्हावं या हेतूने आरोग्याच्या बाबतीत सर्व समस्यांची तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचार मोफत केल्या जात आहे. तसेच महिलांच्या संबंधित अन्याय अत्याचार तसेच कौटुंबिक कलह निराकरण करण्यासाठी महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी श्री.रामेश्वर वसु आणि आरोग्याच्या बाबतीत तपासणीसाठी डॉ.उमेश सावजी यांचं खूप मोठं योगदान तालुक्यातील मातांना होत आहे. आज घडीला 8 दिवसात तालुक्यातील 16 गावांमध्ये कॅम्प घेऊन 3000 पेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ घेतला आहे. 8 मार्च पर्यंत जास्तीत जास्त गावांमध्ये जाऊन 10000 महिलांनी मेडिकल उपचार आणि मार्गदर्शन करायचे आहे. हा कॅम्प यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यासाठी डॉ.उमेश सावजी, (स्त्रीरोग तज्ञ) तसेच महिला व बाल विकास संरक्षण अधिकारी श्री.रामेश्वर वसु व प्रत्येक गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, आशाताई, तसेच बीएएमएस चे इंटर्न डॉक्टर्स व सर्व मित्र परिवार यांची खूप मोठी मदत होत आहे.!
आम्ही काही गावांमध्ये प्रायोगिक
महिलांसाठी मेडिकल कॅम्प घेतल्यावर आम्हाला महिलांच्या आरोग्याच्या बाबतीतील समस्यांचे प्रमाण खूप मोठे असल्याचे दिसून आले आहे. आणि या समस्येमुळेच काही ठिकाणी घरातील कौटुंबिक वाद दिसून येत आहे. यासाठी महिलांनी स्वतः समोर येऊन आरोग्य निदान करून घ्यावं ही विनंती :- विष्णु आव्हाळे
Users Today : 41