दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्य महत्त्वाचे;एस.जी.वाघ

Khozmaster
1 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

सोयगाव तालुका कृषि अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे तिडका येथे पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

आज दिनांक – ०९/०२/२०२३ रोजी मंडळ कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली एस.जी.बोरसे कृषि सहाय्य्क यांचे कडून ज्वारी पिकाचे आहारातील महत्त्व तसेच फायदे याविषयी सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले यात प्रामुख्याने ज्वारीत असलेल्या तंतुमय पदार्थ, थायमिन, रायबोफ्लोवीन, फॉलिक असिड, कॅल्शीयम यांचे महत्त्व सांगण्यात आले. तसेच ज्वारी पिकाचे आहारात असलेले अनन्यसाधारण असे महत्त्व सांगून होणारे फायदे यात प्रामुख्याने हृदयविकार, स्थुलता कमी होणे, संधिवात कमी होणे तसेच गर्भवती महिलांसाठी आवश्यक खजिने व जीवनसत्त्वे यांची उपलब्धता होते तसेच मधुमेहासाठी गुणकारी आहे असे सांगण्यात आले.

आजच्या कार्यक्रामात ए.एस.महाजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोयगाव यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म आन प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती दिली व योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमास एस.जी.बोरसे कृषि सहाय्यक तिडका व ए.एस.महाजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सोयगाव यांनी मार्गदर्शन केले सदरील कार्यक्रमाला गावाचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, प्रगतीशील शेतकरी, कृषि मित्र व गावातील ग्रामस्त उपस्थित होते.

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *