संतांच्या शिकवणुकीतून बोध घ्यावा : सुनील विसपुते पहूर येथे संत नरहरी महाराज पुण्यतिथी शिवभक्त रंगनाथ महाराज यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत

जामनेर तालुक्यातील पहूर येथील संतांच्या शिकवणीतून आजच्या समाजाने बोध घ्यावा , असे प्रतिपादन दुय्यम निबंधक सुनील विसपुते यांनी केले . संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते .

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनार यांच्या निवासस्थानी पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . प्रारंभी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा पुजारी शिवभक्त रंगनाथ महाराज सोनार यांना स्मृती चिन्ह , सन्मानपत्र , स्नेहवस्त्र , गुलाबपुष्प देवून जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला . निवृत्त पोस्टमन शिवलाल तुकाराम सोनार यांना सेवा गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला .आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक गिरीश भामेरे यांना गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .तसेच पूजा दुसाने , दीप्ती सोनार , ऋषिकेश भामेरे , निलेश सोनार , कुणाल भामेरे , अरविंद दुसाने , प्रमोद भामेरे , उदय सोनार , अभय सोनार आदी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .

याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही .जी .भालेराव , स्टेट बँकेचे व्यवस्थापक शफिक पिंजारी , सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष संजय सोनार यांनी मार्गदर्शन केले . गिरीश भामेरे यांनी सत्कारमूर्तींमधून प्राथमिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले .उपाध्यक्ष अरुण मोरे , सचिव अशोक दुसाने , कोषाध्यक्ष रतन भामेरे , भरत भामेरे , गणेश सोनार , किसन मोरे , जयंत जगताप , सुभाष बाविस्कर ,हिरालाल भामेरे , सुरेश सोनार , ईश्वर सोनार , निळकंठ महाराज , भागवत सोनार , गजानन सोनार , अशोक सोनार , शंकर सोनार , नितीन सोनार , विलास भामेरे , जितेंद्र सोनार , राकेश जगताप यांच्यासह समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहसचिव शंकर भामेरे यांनी केले .आभार सचिव अशोक दुसाने यांनी मानले .यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला .

 

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *