सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील मोलखेडा येथे आज दि.८/२/२३ बुधवार रोजी जिल्हा प्रा.शा.मोलखेडा येथे ‘ शिक्षक – पालक सभा ‘ व ‘ सत्कार समारंभ ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आनंदा वारांगणे यांच्या हस्ते करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले आणि पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी श्री.रविंद्र जनार्दन शेळके सर ( ता.अ.सोयगाव , शिक्षक सेना ) , श्री.गजानन रामदास मख सर प्रा.शा.टिटवी यांचा शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला..तसेच सर्वांच्या उपस्थितीत ‘ शिक्षक – पालक संघ ‘ स्थापित करण्यात आला.तसेच अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.यावेळी सरपंच मनीषाताई ज्ञानेश्वर वारांगणे,कें.प्र.मॕडम , सर्व शिक्षक , विद्यार्थी ,उपसरपंच , शा.व्य.स.अध्यक्ष तथा सदस्य व पालक वर्ग, अंगणवाडी सेविका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक , सूञसंचालन , आभार शिक्षकांनी केले .अध्यक्षांच्या अनुमतीने शिक्षक व पालक संघाचा सत्कार सभेचा समारोप झाला.
Users Today : 26