त्यागमूर्ती धम्ममाता रमाईचा आदर्श बहुजन महिलांनी घ्यावा* हि.रा. गवई. *गवई व नेवरे यांनी वृध्दाश्रमास धान्य व जळतन दिले दान

Khozmaster
2 Min Read

चिखली:- ऋणानुबंध समाज विकास संस्थे व्दारा संचालीत तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे आज दिनांक 7 फेब्रुवारी रोजी त्याग मूर्ती धम्ममाता रमाई जयंती चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जेष्ठ साहित्यिक हि रा गवई प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहिर सिध्दार्थ डोंगरदिवे, प्रमुख उपस्थीतीत सामाजिक कार्यकर्ते रामदास नेवरे, सौ नलीनी ताई गवई, कु. सुप्रीया चंदन तायडे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी त्यागमूर्ती धम्म माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना गवई म्हणाले की त्यागमूर्ती धम्ममाता रमाईचा आदर्श बहुजन महिलांनी घ्यावा जेणे करुन माता रमाईला खरी आदरांजली ठरेल यावेळी कु. सृष्टी कर्‍हाडे, कु. दिक्षीता कर्‍हाडे, अनिकेत डोंगरदिवे, शैलेष वानखडे यांनी त्यागमुर्ती रमाई मातेच्या जिवनावर आपले विचार व्यक्त केले.तसेच साहित्यीक हि.रा. गवई यांनी माता रमाई जयंती निमीत्त वृध्दाश्रमास धान्य व फोटो तर शालीकराम कर्‍हाडे व रामदास नेवरे यांनी एक ट्राॅली जळतन वृध्दाश्रमास दान दिले. सुत्रसंचालन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांतभैय्या डोंगरदिवे व प्रास्तावीक रूपालीताई डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रियंका वानखडे यांनी केले. यावेळी वृध्दाश्रमातील वृध्दांसह उत्तम महाराज डोंगरदिवे, रविशंकर डोंगरदिवे, प्रकाश डोंगरदिवे, अवचितराव डोंगरदिवे, सुभाष डोंगरदिवे, कावेरी डोंगरदिवे, लता घेवंदे, समाधान डोंगरदिवे, विलास डोंगरदिवे, किरण डोंगरदिवे, सचिन डोंगरदिवे, संकेत डोंगरदिवे, अनिकेत डोंगरदिवे, सुरज डोंगरदिवे, नितीन डोंगरदिवे, अमोल डोंगरदिवे, विश्वजीत वानखडे, चंद्रभागा वानखडे, नवदिप पवार यांच्यासह बौध्द उपासक उपासिका हजर होते.

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *