नालासोपारा (प) शहरात अनधिकृत बांधकामाचे जाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा बांधकामांवर प्रशासनाचा अंकुश न राहिल्याने शहरात बेकायदा ईमारती, गाळे, मोबाईल टॉवर उभारले जात आहे. नियमांची पायमल्ली करून बांधकामे केली जात आहेत, याबाबत अनेकवेळा कारवाई करण्याबाबत मागणी करून हि प्रभाग समिती ई चे सहाय्यक आयुक्त वनमाळी हे दखल घेत नसल्याने याउलट अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास आले यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्याकडे रूचिता नाईक महिला आघाडी शहर संघटक यांनी प्रभाग समिती ई चा सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा दाखल करून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती आयुक्तांकडून दखल घेत नालासोपारा (प) प्रभाग समिती ई चे सहाय्यक आयुक्त वनमाळी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली.
Users Today : 27