संपादक रमेश चव्हाण यांचं यश अलौकिक आहे- गोपाल मोदानी

Khozmaster
6 Min Read

कार्यालय प्रतिनिधी पत्रकाराचे कार्य तसेच समाजातील अन्याय अत्याचारालाच्या फोडणे आपल्या लेखणीच्या सामर्थ्यांमधून जनसामान्यांना न्याय मिळवून देणे हे सर्व कार्य करत असताना शारीरिक कसरतीच्या खेळात सहभाग घेऊन यामध्ये देशभरात नावलौकिक प्राप्त होईल असे कार्य करणे म्हणजेच आकाशाला गवत निघाल्या समान आहे असे गौरव उद्गार महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदीनी यांनी महेश विद्यामंदिर येथे पार पडलेल्या संपादक रमेश चव्हाण यांच्या अभूतपूर्व सत्कार सोहळ्यात काढले.

जगभरात अतिशय कठीण समजली जाणारी आयर्न मॅन स्पर्धेची कल्पनाही पत्रकार क्षेत्रातील व्यक्ती करू शकत नाही. ही स्पर्धा वेळेत संपून पूर्ण केली संपादक रमेश चव्हाण यांचे करावे तेवढे कौतुक कमी या स्पर्धेला लागणारी जिद्द शारीरिक कसरत आणि मानसिक पावर खूप महत्त्वाची असते. ही स्पर्धा पूर्ण करून रमेश चव्हाण यांनी मेहकर शहराचाच नव्हे तर संपूर्ण पत्रकारितेचा झेंडा देशभरात रोला आहे असे गौरव उद्गार काढत गोपाल मोदी यांनी त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

संपादक रमेश चव्हाण म्हणजे लढाऊ व्यक्तिमत्व उद्योजक प्रशांत सावजी

त्र्यंबक शिवराम सावजी म्हणजे टीएसएस जनता हायस्कूलमध्ये रमेश चव्हाण यांचे माध्यमिक शिक्षण झाले. ही संस्था आमची असल्यामुळे विद्यार्थी अवस्थेपासूनच रमेश चव्हाण यांचा जवळून परिचय आहे अगदी विद्यार्थी अवस्थेतच जिद्द आणि चिकाटी असलेल्या रमेश चव्हाण निश्चित काहीतरी करणार अशी त्यावेळी शिक्षकांची अपेक्षा होती पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत असताना आपल्या नावलौकिकाचा झेंडा त्यांनी जिल्हाभरात उंच ठेवला. ही कामगिरी करत असताना शारीरिक कसरतीचा छंद त्यांनी जोपासत हा फार्म या नावाची स्पर्धा कोल्हापूर येथे संपूर्ण करून माझ्यासह मेहकर वासियांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या अद्वितीय कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

जावे जया वंशी तया ते कळावे- किशोर गारोळे

शिवशक्ती ट्रॅक्टर्स च्या विविध सेमिनार ट्रॅक्टर वितरण प्रसंगी संपादक रमेश चव्हाण यांच्याशी अतिशय जवळून संबंध प्रस्थापित झाला तो म्हणजे पेपर डिजिटल मीडिया मधून जाहिरात करण्यासंदर्भात. व्यावसायिक दृष्टिकोन पाहता रमेश चव्हाण यांचे डिजिटलायझेशन मीडिया यामधून होणारी सततची धडपड आधुनिक आयडिया प्रेझेंटेशन याद्वारे संपर्क दांडगा झाला. डिजिटल पत्रकारिता करत असताना रमेश चव्हाण निश्चितच आपलं नावलौकिक राज्यभर नोंदवतील असा विश्वास होता. परंतु एका एक शारीरिक कसरतीकडे वळत त्यांनी आपला नाव विक्रम नोंदवून हा फायरमॅन स्पर्धेत स्वतःचे नावलौकिक उंचावले प्रसार माध्यमांमधून प्रकाशित प्रदर्शित झालेल्या बातम्या बघून शहरवासीयांसह मी सुद्धा आवक राहलो. जीवनात अशक्य काहीच नसते हे रमेश चव्हाण यांनी त्यांच्या प्रत्यक्ष कृती मधून दर्शवले आहे.

 

रमेश चव्हाण निर्भीड निर्धार पत्रकार -डॉ. पंजाबराव शेजुळ

मातोश्री हॉस्पिटल मधून वैद्यकीय सेवा करत असताना अनेक समाज उपयोगी उपक्रम संपादक रमेश चव्हाण हे करीत असताना मी बघितले काही वर्षांपूर्वी रुग्णवाहिकेमधून समाज सेवा करत असताना त्यांच्याशी परिचय झाला. पत्रकारिता क्षेत्रात अनेक विषयावर निर्भीड निडर लिखाण लाईव्ह डेबिट ठेवणे त्यामधून समाजासमोर सत्य उघडकीस आणणे. अशा प्रकारचे वार्ता अनेक लोकांकडून त्यांच्या बाबत चर्चेला होती. वाढदिवस वर्धापन दिनानिमित्त जाहिरात संकलनासाठी समाजातील अनेक मान्यवरांकडे दाद मागणारे रमेश चव्हाण आज शारीरिक कसरतीत सुद्धा आपल्या नावलौकिक वाढवतील अशा प्रकारचे कोणाच्याही मनात आले नसेल. कार्डिओ क्षेत्रात कसरत करणे म्हणजे मानसिक शारीरिक बळाची पराकाष्टा करण्यासमान असते. त्यातच आयर्न मॅन ही स्पर्धा जगात अतिशय कठीण मानले जाते. ही स्पर्धा त्यांनी मेहकर शहरासारख्या मागासल्या भागामध्ये सराव करून पूर्ण केली. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसताना सुद्धा परिस्थितीचे भांडवल न करता जिद्द आणि सराव यापुढे त्यांनी सहज शक्य करून दाखवले.

 

लेखणीला धारकसरतीची विनोद बोरे मुख्य संपादक जन स्वप्नपूर्ती मीडिया

संपादक रमेश चव्हाण यांनी केलेली अचीवमेंट ही देशभरातील पत्रकारांचा सन्मान वाढवणारी आहे. खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडिया मधून सुरू असलेली वाटचाल सर्व ज्ञात आहे. परंतु शारीरिक कसरतीतही रमेश चव्हाण यांनी आपल्या नावाचा झेंडा अटकेपार रोवला. जगातील कठीण समजल्या जाणारी आयर्न स्पर्धा त्यांनी सहज पूर्ण केली. अर्थातच यामागे त्यांचा शारीरिक कसरतीचा प्रदीर्घ प्रवास आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळ मिळेल त्या ठिकाणी आहे त्या परिस्थितीत सतत धावण्याची त्यांची जिद्द सोशल मीडिया वरून अनेक जण पाहत होते. भाग मिल्खा भाग या ओळीप्रमाणे त्यांनी स्वतःला आयर्न मॅन स्पर्धेसाठी तयार करण्याकरता वाहून दिलं होतं. आमच्या क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांना असं काही करत असताना काही वेळा आम्ही सुद्धा संभ्रमित झालो होतो. परंतु 29 जानेवारीच्या त्यांच्यात ध्येय प्राप्तीनंतरच्या प्रसारित झालेल्या बातम्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करून टाकले. ठरवले ते साध्य करणे ही रमेश चव्हाण ची धाडसी प्रवृत्ती आहे. अशा जिद्दी आणि मेहनती माणसाच्या कर्तुत्वाचे करा व तेवढे कौतुक कमीच आहे.

शहरात सगळीकडे होत असलेल्या सत्कार बद्दल रमेश चव्हाण यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. शहरातील सकारात्मक लोक नेहमी पाठीशी ठाम उभे असल्यामुळे. आज हा यशाचा पल्ला काढता आला. असे यावेळी त्यांनी सांगितले. अर्थातच ही पूर्व तयारी करीत असताना अनेक वेळा टीका टिप्पणी सुद्धा सहन करावी लागली. आर्थिक दृष्ट्या प्रचंड खर्चिक बाब असताना अनेक दानशूर व्यक्तींनी आपल्या पाठीशी ठाम उभे राहिले. शारीरिक कसरत आणि मानसिक आधार हे तेवढेच महत्त्वाचा आहे. यावेळी सतत आपल्या पाठीशी सविता मगर ही भगिनी कोच बनून खंबीर उभ्या होत्या. एवढ्या मोठ्या ध्येयाकडे वाटचाल करीत असताना परिवाराची साथ तेवढी महत्त्वाची होतीच. मेहकर शहरातील क्रीडा संकुल येथे सराव करणारे सर्व युवक, ज्ञानगंगा ग्रुप बुलढाणा, पुणे येथील डेक्कन जिमखाना टीम, तिलक तलाव येथील स्विमिंगकोच खटावकर सर, पुणे येथील मलेशियामध्ये देशामधून दुसऱ्या क्रमांकावर राहणारे आयर्न मॅन झेंडे यांचे विशेष मार्गदर्शन यावेळी लाभले. कोणत्याही व्यक्तीचे यश हे एका पुरते सीमित न राहता त्या यशाचे शिल्पकार हे त्याचे त्या कथानकातिल पडद्यामागचे नायक असतात असे रमेश चव्हाण यांनी सांगितले.

 

0 9 4 7 5 2
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *