प्रविण चव्हाण
नंदुरबार -: कल्चरल फौंडेशन यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कलागौरव पुरस्कार 2023 यंदा जितेंद्र खवळे यांना चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात पार पडलेल्या कार्यक्रमात खवळे यांनी गेल्या 20 वर्षापासुन सांस्कृतिक क्षेत्रात जसे 1500 ते 1600 विविध विषयांवरील पथनाट्य, अनेक एकांकिका, नाटक, बालनाट्य, अहिरानि-मराठी चित्रपट अल्बम आणि महाविद्यालयीन जीवनात विडंबननाट्य, मुकनाट्य, एकपात्री प्रयोग केले आहेत.
पुरस्कार विजेते लघुचित्रपट, माहितीपट त्यात त्यांनी केलेले अभिनय, लेखन, दिग्दर्शन, संकल्पना अश्या अनेक वेगवेगळ्या भूमिकेतून कार्य केलेले आहे. त्यांच्या ह्या 20 वर्षांचा संस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला. प्रसंगी सर्व कल्चरल फौंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
जितेंद्र खवळे हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रमेश खवळे यांचे चिरंजीव आहेत.
नंदुरबारच्या संस्कृतिक क्षेत्रातील मान्यवराकडून अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
Users Today : 12