कार्यालय,प्रतिनिधी -मेहकर शहरातील अवैध व्यवसायिकांचे मनोबल उंचावले असून दिवसाढवळ्या पत्रकारांना मारहाण करून जीववानिशी मारण्याचा प्रयत्न स्थानिक आव्हाळे हॉस्पिटल शिवाजी नगर परिसरात अफरोज कुरेशी व त्याच्या मित्राकडून करण्यात आला..!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दैनिक खोज मास्टर चे विभागीय प्रतिनिधी एजाज खान हे 8 मार्च जागतिक महिला दिन निमित्त जाहिरात संकलन करत असताना आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी आभाळे हॉस्पिटल शिवाजी नगर येथे गेले असता, वरली व रेशन माफिया ऑफ रोज कुरेशी आपल्या इतर चार-पाच मित्रांना घेऊन तेथे आला एजाज खान यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत, तू आमच्या रेशन वरली च्या बातम्या लावतोस तुझ्यामुळे माझी गाडी साखरखेर्डा पोलीस स्टेशन मध्ये जमा आहे, मी तुझे हात पाय तोडून जिवाणूशी मारणार आहे. अशा प्रकारचे विधान करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दवाखाना परिसरातील नागरिक व एजाज खान यांच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. परंतु जाता वेळी मी तुला हात पाय तोडून जिवानिशी मारणार. असा धमकी वजा इशारा अफरोज कुरेशी व त्याच्या मित्रांनी दिला. यापूर्वी सुद्धा अफरोज कुरेशी त्याचे वडील व लहान बंधू यांनी एजाज खान याला जीवा मारण्याची धमकी दिली होती. परंतु जीवाची पर्वा न करता एजाज खान यांचे वृत्तसंकलन सुरू होते. 24 फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर परिसरात घडलेला प्रकार हा खोज मास्टर चे मुख्य संपादक रमेश चव्हाण यांनी पोलीस हेल्पलाइन 112 वर संपर्क करून त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्याचप्रमाणे मेहकर लँडलाईन नंबरशी संपर्क केला असता त्या क्रमांकावर कोणी प्रतिसाद देत नव्हते. म्हणून घडलेला प्रकार हा पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी मेहकर यांना सुद्धा भ्रमणध्वनीवरून सांगण्यात आला. पत्रकारांवर होणारे हल्ले ही गंभीर बाब आहे. नुकताच पत्रकाराच्या हत्येचा प्रकरण ज्वलंत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली ही घटना म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाटे…
या समान आहे. खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने या रेशन वरली माफियांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई न झाल्यास. खोज मास्टर ग्रुप ऑफ इंडिया च्या वतीने राज्यभर संविधानात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात येतील. यावर सुद्धा पोलीस विभाग यथोचित कारवाई केली नाही तर, मुख्य संपादक रमेश चव्हाण हे पोलीस आयुक्त अमरावती यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले आहे.
यामुळे घडलेल्या घटनेबाबत पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांची भूमिका काय असणार..? यानुसारच खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडिया पुढील रूपरेषा ठरवणार आहे. तूर्तास एवढेच…
Users Today : 48