मेहकर परिसरात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू. अन्न औषध विभाग हप्ते खाऊन सुस्त..!!

Khozmaster
3 Min Read

कार्यालय,प्रतिनिधी – तालुकयातील नागरिक गुटखा खाण्याची सवयी ला आहारी जाऊन निरोगी सुदृढ शरीराला कीड लावून घेत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा गुटखा खाण्याचे क्रेज वाढले असून शाळा महाविद्यालय परिसरात सुद्धा जोमात गुटखा विक्री सुरू झाला आहे. याप्रकरणी गुटखा माफियांचे मनोबल उंचावले असून त्यांना पोलीस विभाग अण्णा औषध प्रशासनाचे कोणतेही भय उरले नाहीत. अर्थातच अण्णा औषधी या प्रकरणी हप्ते खाऊन गप्प बसत आहे अशा प्रकारची चर्चा असुद्या नागरिक वर्तवित आहेत.

शहरासह तालुका भर अवैध गुटखा विक्री दुचाकी चार चाकी मधून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील छोट्या टपऱ्यासह अनेक मोठ्या दुकानात सुद्धा सर्रास गुटखा विक्री सुरू आहे. गुटखा ठाणे हे कॅन्सरला निमंत्रण असून यामुळे शरीराला पूर्णतः कीड लागली जाते असे असताना सुद्धा शालेय महाविद्यालय विद्यार्थी मोठ्या आयटीत गुटख्याचे सेवन करताना आढळतात. अशा गुटखा शौकीन विद्यार्थ्यांना शिक्षकासह आई-वडील कमालीचे त्रस्त झाले आहेत. गुटखा खाण्याची सवय जडल्यामुळे अनेक युवक नकळत या व्यवसायात गुरफटले जात आहेत. दुचाकी चार चाकी वरून गुटक्याची अवैध वाहतूक करत असताना अशा युवकांना ऐच्छिक मोबदला देण्यात येतो. परंतु गुटखा वाहतूक करत असताना या युवकांच्या वाहनाचा वेग कमाल असतो. त्यामुळे अनेक वेळा अपघात होऊन काही युवकांना अपंगत्व सुद्धा आले आहे. अशाप्रकारे युवा पिढी अवैध गुटखा विक्री, वाहतूक करताना विना नंबरची वाहन वापर करीत आहेत. अर्थातच ही वाहने चोरीची आहेत किंवा नाही याबाबत सुद्धा शंका व्यक्त केली जात आहे. दिवसाढवळ्या पोलिसांसमक्ष अवैध गुटखा वाहतूक केली जाते. पोलीस स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात अनेक गुटखा किंग चे अवैध गुटखा साठवणुकीचे गोडाऊन आहेत. इतर गुन्ह्याची तपासणी करताना पोलीस विभाग ज्या पद्धतीने आपली प्रतिष्ठा पणाला लावतात अवैध व्यावसायिका प्रति पोलीस विभागाला एवढा लगाव कशाला पाहिजे. असा प्रश्न सुद्धा सर्वसामान्य जनतेला निर्माण होत आहे. जगातील आश्चर्य म्हणून शहरातील आराध्य स्थान श्री शारंगधर मंदिर या परिसरात सुद्धा गुटखा माफियाचे राज्य असून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा वाहतूक साठवण केली जाते. अशा प्रकारची चर्चा सुद्धा भाविक भक्तामध्ये आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या गुटखा वाहतुकीच्या गाडीमुळे शारंगधर परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मंदिराच्या गेट समोर दुचाकी वर होणारा अवैध गुटखा वाहतुकीमुळे भाविक भक्ताची कोंडी होत आहे. याप्रकरणी अन्न औषध विभाग कमालीचा स्वस्त झाला आहे. त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न निर्माण होत आहे. शहरासह तालुक्यात होत असलेल्या अवैध गुटखा वाहतूक विक्रीवर शासनाची बंदी असताना. केवळ औपचारिक कारवाई करताना अन्न औषध प्रशासन आढळून येते.

 

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *