वझर आघाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस उत्कृष्ट कामा बद्दल महिला दिनी सन्मान

Khozmaster
2 Min Read

 

ज्ञानेश्वर सुपेकर

लोणार

शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून दरवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी सेविका मदतनीस पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तालुक्यातील वझर आघाव येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस यां कामाच्या मानकरी ठरल्या असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा महिला दिनी बुलडाणा येथे महिला व बालकल्याण विभागाकडून आदर्श पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.

लोणार तालुक्यातील वझर आघाव येथील अंगणवाडी सेविका आम्रपाली समाधान मोरे व मदतनीस कावेरी रामेश्वर आघाव या वर्षीचा उत्कृष्ट कामाच्या मानकरी ठरल्या विशेष म्हणजे एकाच गावातील दोन महिला कर्मचारी यांना हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी वझर आघाव येथील शाळेत रंग रागोटीतून बाराखडी आणि अंक शाळेच्या भिंतीवर रेखाटल्यामुळे शाळेत शिक्षक नसतांना सुद्धा विध्यार्थी अभ्यास करू शकतात. अंगणवाडी चे रेकॉर्ड अध्यावत ठेवले. तसेच गावातील अंगणवाडी आदर्श अंगणवाडी केली व सातत्याने त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. त्याच्या कामाची दखल घेत एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या अश्विनी ठाकरे यांनी त्यांचा प्रस्ताव सादर केला होता.

या वेळी जिल्हापरिषद चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रामरामे एकात्मिक बालविकास अधिकारी अश्विनी ठाकरे पर्यवेक्षिका शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थिती त सदर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्यात आला.

या निवडीचा वझर आघाव ग्रामस्थांनी दोन्ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अभिनंदन करत त्यांचे स्वागत केले त्यांच्या या पुरस्कारामुळे लोणार तालुक्याचे मान उंचावली असून लोणार तालुक्यातील शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे

या पुरस्कारामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

या अगोदर व वझर आघाव ग्रामपंचायत चे तत्कालीन सरपंच रामेश्वर सिताराम आघाव यांनी जिल्हास्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त केला होता व आता त्याच गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गावाला पुरस्कार मिळवून देत गावकऱ्यांचा आनंद द्विगुणीत केला

 

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *