आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना

बुलडाणा : शेत पांदण रस्ते हे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठीच्या जिवन रेखा आहेत. या जिवन रेखा मागील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने चिखलानेच भरलेल्या राहिल्या. पावसाळ्यात चिखल तुडवून तर इतर ऋतूत धूळ आणि खड्डे तुडवीत शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. यामुळे आजच्या यांत्रिक युगात सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात जायला व्यवस्थित रस्ता नाही. गत वर्ष भरात चिखली विधान सभा मतदार संघात चिखलीविधानसभा मतदारसंघानीय १२६ गावातील ४५५ किमी शेत पांदण रस्त्यांना मातोश्री पाणंद रस्ते योजने अंतर्गत मान्यता मिळालेली आहे. परंतु यंत्रणांच्या उदासीनतेमुळे शेत पांदण रस्त्यांना मान्यता मिळूनही अद्याप सुरूवात झालेली नाही. त्यामुळे मातोश्री शेत पांदण रस्त्यांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून मान्यता प्राप्त कामांना तातडीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील मातोश्री शेत पांदण रस्त्यांच्या आढावा बैठकी दरम्यान दिल्या.
दि ११ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी डॉ तुमोड यांच्या यांच्या उपस्थीतीत जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मातोश्री शेत पांदण रस्त्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
*आढावा बैठकीतच रोजगार हमी योजना प्रधान सचिवांना केला फोन*
आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी मातोश्री पांदन रस्त्यामध्ये येणाऱ्या अडचणीचा पाढा वाचण्यास सुरुवात केली असता आमदार सौ श्वेता ताई महाले यांनी रोजगार हमी योजनेची प्रधान सचिव नंदकुमार यांना फोन लावून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या.
*जो काम करणार नाही त्याच्यावर कारवाई*
*EGS प्रधान सचिव नंदकुमार*
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता दिसत नाही . कामे व्हावीत त्यासाठी शासनाने सुटसुटीत शासन निर्णय काढलेले आहे .जनतेची कामे व्हावी यासाठी हवे तेव्हढी लवचिकता स्वीकारून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. तरीसुद्धा केंद्राचा एवढा मोठा निधी मिळून सुद्धा राज्यामध्ये मनरेगाची कामे पाहिजे त्या प्रमाणात होत नाही . मातोश्री पांदण रस्ते हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याने आणि अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा बरीचशी मंडळी ही भूमिपुत्र असल्याने त्यांनी मातोश्री पानंद रस्त्यांची कामे तातडीने मार्गी लावावी याबाबत जो कर्मचारी अधिकारी काम करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची संकेत रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी आढावा बैठकीदरम्यान सौ श्वेता ताई महाले यांनी त्यांना भ्रमणध्वनीवरून आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्याची विनंती केली त्यावेळी केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी माचेवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहयो, अरुण मोहोड, कार्यकारी अभियंता राऊत, ठाकरे, गट विकास अधिकारी शिवशंकर भारसाखले, सरीता पवार, उपअभियंता दीपक चिंचोले, बिहाडे, भाजपा तालुका अध्यक्ष ऍड सुनील देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, राजू चांदा, विष्णू वाघ, आस्तिक वारे, संदिप सोनुने, यांची उपस्थिती होती.
Users Today : 48