सामाजिक कार्यातुन कर्मयोगी स्व.तात्यासाहेब जनसामान्यांसाठी ऋर्षीतुल्य ठरले – सत्यपाल महाराज

Khozmaster
4 Min Read

चिखली/बुलडाणा: 10 मार्च 2023

कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी आपल्या हयातीत उभारलेल्या संस्थांच्या माध्यमातुन समाजात शैक्षणीक व आर्थीक प्रगतीच्या वाटा मोकळया करून दिल्या. त्याचा लाभ सर्व समाजातील हलाकीची परिस्थीती असलेल्या शेतकरी, कष्टकरी, शेत मजुरांच्या मुलांना झाला असुन परिणामी ते उच्च षिक्षण घेवुन परदेषात वावरतांना दिसतात. स्व. तात्यासाहेब यांनी अनुराधा परिवाराच्या माध्यमातुन जिवनभर प्रत्यनांची पराकाष्ठा करून अनुराधा परिवाराच्या लावलेल्या इवल्याषा रोपटयाचे रूपांतर आजरोजी महावटवृक्षात झाल्याचे पहावयास मिळत आहे. कर्मकांडातुन कर्मयोगी म्हणुन सर्वदुर परिचीत झालेले स्व. तात्यासाहेब मरणोप्रांत जनसामान्यांकरीता ऋषीतुल्य ठरले असल्याचे प्रतिपादन विदर्भातील सुप्रसिध्द समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी किर्तन प्रसंगी केले.

स्व.तात्यासाहेब बोंद्रे यांच्या स्मृतीत अनुराधा परीवाराने 13 दिवस विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याअंतर्गत दिनांक 7 मार्च रोजी व्यसनमुक्ती व अंधश्रध्देवर अस्सल वराडी रसाळ वाणीतुन प्रखर प्रहार करणारे विदर्भातील सुप्रसिध्द समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. अनुराधा नगरीतील श्री मुंगसाजी महाराज मंदिर परीसरातील सभागृहात या किर्तनाकरीता रंगपंचमीच्या पावन पर्वावर परीसर व पंचकृषीतुन आलेल्या हजारो महिला व पुरूष श्रोत्यांची मादीयाळी उसळली होती. किर्तनाच्या प्रारंभी हिरकणी परीवाराच्या वतीने सत्यपाल महाराज त्यांच्या सहकार्याचे स्वागत करण्यात आले.

 

जे का रंजले गाजले । त्यासी म्हणे जो आपले

समाज कल्याणसाठी जे झटले तोची खरा संत ।।

संत श्री तुकाराम महाराजांच्या या ओवीतुन आपल्या समाज प्रबोधन किर्तनाला सुरूवात करण्यापूर्वी सत्यपाल महाराज यांनी ऋषीतुल्य कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांना आपल्या वैषिष्टयपुर्ण शैलीतुन श्रध्दासुमनांनी श्रध्दाजंली अर्पण केली. यावेळी ते पुढे म्हणाले स्व.तात्यासाहेबांनी भौतीक सुख सुविधांचा त्याग करून तब्बल 23 वर्ष वानप्रस्थातील जिवन स्विकारून तपस्वी जिवन व्यतीत केले. दुर्लक्षीत बहुजन समाजाला सर्वस्तरातुन उभारी देण्यासाठी 21 व्या शतकानुरूप प्रगती साधण्यासाठी विविध शैक्षणीक संस्था उभारल्या. संताची विचारसारणी आचरणात आनलेल्या तात्यासाहेबांनी उदिष्टीत व उभारलेले प्रकल्प रात्रंदिन केलेल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेतुन निर्माण केले. तात्यासाहेबांनी या उजाड माळरानावर षिक्षण संस्था उभारून परीसराचे नंदनवन केले म्हणुन शेतकरी, शेतमजुरांच्या मुलांना उच्च षिक्षण घेता आले. तात्यासाहेबांच्या जाण्याने सामाजीक हाणी झाली असुन कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. भावी पिढीने त्यांच्या विचारांचे अनुकरण हीच स्व. तात्यासाहेबांना खरी श्रध्दाजंली ठरेल असे सांगुन आपल्या हयातीत केलेल्या समाजोपयोगी कर्मकांडातुन कर्मयोगी म्हणुन सर्वसामान्यात परीचीत असलेले स्व. तात्यासाहेब त्यांनी केलेल्या महान कार्यामुळे ते सर्वसामान्यांचे ऋषीतुल्य ठरले आहे. आपल्या किर्तनातुन सत्यपाल महाराज यांनी स्व. तात्यासाहेबांच्या जिवन चरित्रावर प्रकाष टाकीत त्यांनी केवळ आपल्या कुटूंबियांचा विचार न करता शैक्षणीक, सामाजिक, सहकार व औद्योगिक प्रकल्पांच्या उभारणीतुन असंख्य हातांना रोजगार उपलब्ध करून दिला.

यावेळी उपस्थितांना संबोधीत करतांना सत्यपाल महाराज म्हणाले, समजाच्या उभारणीत महापुरूषांनी आपले सर्वस्व पणाला लावले, संताच्या विचारसारणीला जिवनक्रमन केल्यास जिवन सार्थकी लागते. महिलांना संबोधतांना ते म्हणाले महिलांनी अंधश्रध्दा, बुवाबाजी, ज्योतीषी, यांच्या गुंतवू नये, संत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे महाराज आदींच्या विचारांचे अनुकरण करावे. मुला बाळांना संस्कारीत करून त्यांच्यात षिक्षणाची गोडी निर्माण करावी असे सांगुन छत्रपती षिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, राजश्री शाहु महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी थोर महापुरूषांचे विचार अंगीकृत करावे. समाजातील जुन्या चाली, रिती, रूढी, परंपरा यांच्यात न गुरफुटून, अधोगती न पतकरता जिवन सुसंस्कृत मार्गाने यषस्वी करावे. असे सांगुन व्यसनमुक्तीमुळे समाजाचे कषा प्रकारे अनिष्ठ होते याची उदाहरणे देत आपल्या भावना व्यक्त केेल्या. या किर्तन प्रसंगी जितेंद्र दादा बोंद्रे, राहुलभाउ बोंद्रे, सौ. सुचेताताई शाहीर, सौ. भारतीताई बोंद्रे, अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, यांच्यासह हिरकणी परीवार, अनुराधा परीवाराचे सर्वच सदस्य व परीसरातुन आलेल्या अबालवृध्द महिला, पुरूषांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

 

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *