चिखली/बुलडाणा: 12 मार्च 2023
बु
लडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य तथा शेतक-यांच्या जिव्हाळयाची बॅंक म्हणुन चिखली येथील अनुराधा अर्बन बॅंकेची नावलौेकीकता आहे. नुकतेच नागपुर येथील विदर्भ अर्बन बॅंक्स असोषियषन ने 2020-21 या मागिल आर्थीक वर्षात 100 कोटी रूपया पर्यंतच्या ठेवी असलेल्या गटातुन विदर्भातुन उत्कृष्ठ कामगिरी करणा-या अनुराधा अर्बन बॅंकेचा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे अध्यक्ष असलेल्या अनुराधा अर्बन बॅंकेचे संचालक प्राचार्य डॉ. पुरूषोत्तम वायाळ, हाजी नाजिम खासाब, तज्ञ संचालक पंढरीनाथ टकाळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन गायके तथा पंकज ढवळे यंानी दोन दिवसीय विदर्भ स्तरीय परीसंवाद कार्यक्रम प्रसंगी नागपुर येथे हा पुरस्कार स्विकारला. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणुन केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांची तर उद्घाटक म्हणुन नागपुर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संजय भेंडे तथा प्रमुख अतिथी म्हणुन एन.ए.एफ सि.यु.बी.चे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतींद्रभाई मेहता, रिझर्व बॅंकेचे संचालक गुरूमुर्ती, विदर्भ बॅंक असो.अध्यक्ष रविंद्र दुरगकर, उपाध्यक्ष सतिष गुप्त, सचिव तुषार क्रांती यांचीही उपस्थिती होती.
विदर्भ अर्बन बॅंक को.ऑप असोषियनने नागपुर येथे दोन दिवसीय विदर्भ स्तरीय परीसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात विदर्भातील सहकार क्षेत्रात सुमारे 54 बॅंका कार्यरत आहे. यात 100 कोटी रूपया पर्यंत ठेवीच्या गटातून विदर्भातील अग्रगण्य संस्था म्हणुन अनुराधा अर्बन बॅंकेचा उत्कृष्ठ बॅक म्हणुन पारीतोषीक देवुन गौरव करण्यात आला. निर्सगाषी लढा देत मेटाकुटीस आलेल्या शेतकरी व लघु व्यवसायीकांना तात्काळ माफक दराने कर्ज पुरवठा करून त्यांना उभारी देण्याचे कार्य अनुराधा अर्बन बॅंक गेल्या अनेक वर्षापासुन करीत आहे.
या दोन दिवसीय विदर्भ स्तरीय परीसंवाद प्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी म्हणाले की, नागरी सहकारी बॅंकांच्या संचालकांनी प्रामाणीकपणे काम केले पाहीजे, राज्याच्या विकासात नागरी सहकारी बॅंकांचे मोठे योगदान आहे. बॅंकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नषिल राहु असे आष्वासन केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यावेळी दिले. यावेळी नागरी बॅंकांच्या समस्या बाबत माहिती असो.च्या वतीने वेळोवेळी केलेल्या कार्याचा आढावा घेत नागरी बॅंकांच्या संचालक व कर्मचारी अधिक प्रषिक्षीत कसे होतील याकडे असो.चा भर राहणार असल्याचे असोषियषन अध्यक्ष रविंद्र दुरूगकर यांनी सांगितले. तर सहकार क्षत्रातील नविन कायदे व अंब्रेला ऑर्गेनायजेषन बद्दल नॅषनल फेडरेषन ऑफ सोसायटी आणी अर्बन बॅंकेचे अध्यक्ष ज्योतींदभाई मेहता यांनी सविस्तर माहिती दिली. अनुराधा अर्बन बॅंकेला सहकार क्षेत्रातील हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे सर्वच स्तरातुन बॅंकेचे कौतुक होत आहे.
ऋषीतुल्य कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या अनुराधा अर्बन या बॅंकेने जनसेवेचा वारसा कायम ठेवत अत्याधुनिक सुविधा पुरवून ग्राहकांच्या विष्वासास सार्थ ठरविले आहे. शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरीक व व्यावसायीकांकरीता शासकीय व स्थानिक पातळीवरील विविध गरजा लक्षात घेता विविध योजना राबवून अनुराधा अर्बन बॅंकेने नागरीकांना आर्थीक बळकटी देत बुलडाणा जिल्हयातील सहकार क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटविला. बॅंकेतुन दैनंदीन व्यवहारात कर्ज वाटप करणे सोपे आहे मात्र वाटप केेलेल्या कर्जाची वसुली करणे हे जिकरीचे कार्य आहे. सहकार चळवळीत अग्रगन्य ठरलेल्या अनुराधा अर्बन को.ऑप बॅंकेने शुन्य टक्के थकीत ठेवीत वसुलीचा षिवधनुष्य पेलला आहे. तर विदर्भ अर्बन बॅंक्स असोषियषन ने ठरविलेल्या 100 कोटी पर्यंत ठेवी मिळविण्याचा बहुमान प्राप्त करीत बुलडाणा जिल्हयाच्या सहकारात आपला वेगळास ठसा उमटविला आहे. तर याचबरोबर सन 2021-22 या आर्थीक वर्षात कर्ज वसुलीसाठी बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले जोमाचे प्रयत्न व कर्जदार यांनी परतफेडीत वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच बॅंकेचे नक्त अनुत्पादक कर्ज 0 टक्के ठेवण्यात बॅंकेने मजल मारली आहे. यषस्वी ठरल्याबध्दल बॅंकेचे सर्व संचालक व अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेली मेहनत कोैतुकास्पदच असल्याची प्रतिक्रीया बॅंकेचे अध्यक्ष राहुलभाउ बोंद्रे यांनी दिली.
Users Today : 48