प्रतिनिधी
मूर्तिजापूर– तालुक्यातील ग्रामपंचायत कार्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या नविन विहिरीच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी उपसरपंच व दोन ग्राम पंचायत सदस्यांनी येथील पंचायत समिती समोर पासून उपोषण सुरू केले.
जुन्या पाणी पुरवठा योजनेची विहिर बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे बरेच दिवसापासून गावातील पाणी पुरवठा बंद असून गेल्या तीन वर्षांपासून नविन विहिरीसाठी अंदाजे रुपये २२ ते २५ लाखाचा निधी मंजुर झालेला आहे, परंतु संबंधीत अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही,त्यामुळे पिण्याच्या पाण्याकरीता ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. नविन विहिरीच्या अपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा उपोषणकर्त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात वर्षभरापूर्वी अर्ज दिल्यानंतर समजुत काढून काम पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यांत आले होते, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे उपसरपंच प्रभा वानखडे व ग्राम पंचायत सदस्य सुरज निंघोट आणि देवानंद किर्दक यांनी उपोषण सुरू केले आहे.
Users Today : 2