बुलढाणा – स्नेहींनो, युवा उद्योजक संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्ताने आजच्या दिवसापासून आपण युवा शक्ती जागृतीला सुरुवात केली आहे. युवा ऊर्जास्रोत या सातव्या पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरात युवकांच्या शक्तीला जागृत करून त्यासंदर्भातील सकारात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. अशा कार्यक्रमाची सुरुवात युवा उर्जास्त्रोत या पुस्तकाचे प्रकाशन करुन झाली आहे. युवा ऊर्जास्रोत पुस्तकाचे प्रकाशन सन्माननीय संदीपदादा शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील शेळके साहेब, प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे साहेब, मालतीताई शेळके, व्हाईस आॅफ मिडियाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, पत्रकार बोर्डे, युवा शक्ती जागृतीचे संकल्पक-लेखक विनोद बोरे उपस्थित होते.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.
युवा शक्ती सकारात्मक दिशेने वळविणे काळाची गरज: सुनील शेळके युवा शक्ती सकारात्मक दिशेने वळविणे ही काळाची गरज आहे, असे मत अभिता कंपनीचे संस्थापक सुनिल शेळके यांनी व्यक्त केले. युवा ऊर्जास्रोत ही संकल्पना प्रेरणादायी: संदीप दादा शेळके युवा ऊर्जास्रोत ही संकल्पना प्रेरणादायी आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवीन सकारात्मक उपक्रम मिळणार आहे. सकारात्मक युवा शक्ती एकत्र आली तर एक नवा इतिहास घडेल, असेही संदीप दादा शेळके म्हणाले.सकारात्मक विचारांना मिळत आहे चालना: राजेंद्र काळे या वेळी राजेंद्र काळे म्हणाले,की विनोद बोरे यांच्या संकल्पनांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात सकारात्मक विचारांना चालना दिली जात आहे. संदीप दादा शेळके यांच्यासारख्या अनेकांचे कार्य समाजासमोर आणण्याचे काम ते करीत आहेत.समाज घडविणारा उपक्रम: लक्ष्मीकांत बगाडे युवा शक्ती जागृतीचा उपक्रम हा समाज घडविणारा आहे. याचे फळ भावी काळात सर्वांना चाखायला मिळतील, असे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांत बगाडे म्हणाले.सकारात्मक संकल्पनाच समाजात चांगला बदल घडवतील: विनोद बोरे सकारात्मक संकल्पनाच समाजात चांगला बदल घडवू शकतात, यावर माझा प्रचंड विश्वास आहे. त्यानुसारच वाटचाल करणे, हा माझ्या जीवनाचा मूलमंत्र आहे. याद्वारे सकारात्मक विचारधारा पेरत राहून शक्य तेवढे चांगले काम समाजात घडत राहील. संदीपदादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवा शक्ती जागृतीची सुरुवात झाल्याचा आनंद आयुष्यभर राहील, असेही विनोद बोरे म्हणाले.
Users Today : 2