छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
चिखली:-ऋणानुबंध समाज विकास संस्था, चिखली,रजि. नं.534 F-11058 द्वारा संचालीत ऋणानुबंध बौध्द वधुवर सुचक केंद्राच्या वतीने बौध्द वधुवर परीचय मेळावा दि.19 मार्च 2023 रोज रविवार दुपारी 01:00 ते 05:30 वाजेपर्यंत पंचशील बुध्द विहार, गजानन नगर, चिखली ता. चिखली जि. बुलडाणा येथे आयोजित करण्यात आला आहे तरी विवाह ईच्छुक बौध्द वर वधु यांनी या परीचय मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर असे की,बौद्ध वधु-वर परीचय महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बौध्द धर्मातील डाॅक्टर, वकील, ईंजिनीअर, क्लास-1, क्लास-2, सरकारी, निमसरकारी, प्रोफेसर, शिक्षक, मॅनेजर, व्यावसायिक, उच्चशिक्षीत, पदवीधर, शेतकरी, मजुरदार, कंपनीत नोकरी, स्व व्यवसाय,प्रथम वधु-वर, घटस्फोटीत, विधुर विधवा अपंग व बौध्द समाजातील विवीध क्षेत्रातील स्थळे एकच ठिकाणी भेटतील, मेळावा 01:00 ते 03:30 वाजेपर्यंत सर्व मेळावे चे मेंबर च्या प्रोफाइलची माहीती पाहता येईल 03:30 वाजल्यापासून प्रत्यक्ष मुल मुली आपल्या प्रोफाइल सांगतील कोणालाही कोणाची प्रोफाइल पसंत असेल तो ते बातचीत करू शकता व ऋणानुबंध बौध्द वधुवर सुचक केंद्र तुम्हाला सहयोग करेल. अपेक्षा आहे की आपल्याला मनपसंत सोयरीक भेटावी आणि आपल्या घरी लग्नसराई चा आनंद असावा.तसेच मेळाव्यामधे नाव नोंदणीसाठी डॉ. सुभाष राऊत,प्रा.पि.एस.खिल्लारे, एस एस गवई, अर्जुन बोर्डे, भारत साबळे दयानंद निकाळजे, प्रताप मोरे पत्रकार, प्रशांतभैया डोंगरदिवे, सौ रुपाली डोंगरदिवे किंवा ऋणानुबंध बौध्द वधुवर सुचक केंद्र,8855850378 / 9689331853 किंवा ऋणानुबंध समाज विकास संस्था,चिखली,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग नविन तहसिल समोर, BOI चे ATM शेजारी चिखली जि. बुलडाणा येथे संपर्क करावा असे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Users Today : 2