राहुलभाउ बोंद्रेंच्या हस्ते तथागत भगवान बुध्द यांच्या मुर्तीची स्थापना

Khozmaster
4 Min Read

चिखली/बुलडाणा: 15 मार्च 2023

अथांग आकाषासारखं ज्ञान म्हणजेच भगवान बुध्द, भगवान गौतम बुध्दांनी जगाला शांतीचा संदेष व विचार दिले त्या विचारांचा अभ्यास करण्यापेक्षा ते विचार आचरणात आनले पाहीजेत. ‘बुध्द’ या शब्दाचा अर्थ अथांग आकाषाऐवढा विराट, सर्वज्ञ महाज्ञानी असुन संपुर्ण जगातील मानव जातीला बंधु प्रेम व शातंतेचा संदेष देणारे महामानव म्हणुन तथागत भगवान गौतम बुध्द यांची विष्वभरात ख्याती आहे. आज जगामध्ये वेगवेगळया नावांनी वेगवेगळया शक्ती व मनुवादी विचारसारणी मानवजातीमध्ये वैमनस्य व तेढ निर्मीतीस कारणीभुत ठरत असतांना पुन्हा जगाला युध्द नको बुध्द हवा अषी परीस्थती निर्माण झाल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी तालुक्यातील इसोली या गावी केले.तालुक्यातील ग्राम इसोली येथील नागसेन बुध्द विहार येथे महाकारूनीक तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मुर्तीची स्थापना माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांच्या हस्ते काल दिनांक 14 मार्च रोजी करण्यात आली. याप्रसंगी बोध्द भिक्कु संघाचे पुज्ज भंते महानाम महाथेरो, षिलरत्न थेरो, महेंद्रबोधी थेरो, भंते बुध्दपुत्र तथा श्रामनेरसंघ यांची विषेष उपस्थिती होती. यावेळी पुज्ज भंते यांनी उपस्थितांना धम्म बेसना दिली, इसोली येथे श्रामनेर षिबीराचे गेल्या काही दिवसापासुन आयोजन करण्यात आले होते. मोठया प्रमाणात किषोरवयीन मुले या षिबीरात गेल्या अनेक दिवसापासुन अध्ययन करीत आहेत.यावेळी उपस्थितांना संबांेधीत करतांना राहुलभाउ बोंद्रे पुढे म्हणाले विष्वाला शांतीचा संदेष देणारे बहुतांष महामानव आपल्या या देषात जन्माला आले आहेत. त्याचा भारतीय म्हणुन सार्थ अभिमान बाळगायला हवा, जागतीक स्तरावर प्रत्येक देष विविध प्रकारची अत्याधुनीक विघातक शस्त्रास्त्रे गोळा करीत आहे. देषात धर्म,पंथ व जाती जातीच्या नावाने आपसात वैरभावना निर्मीती करून मानसा मानसात भेद निर्माण करणारी संस्कृती रूजवली जात आहे. या भारत देषाच्या निर्मीतीचा आधार लोकषाही असुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत घटना व लोकषाही आज संकटात सापडली आहे. त्या घटना व लोकषाहीचं संरक्षण करण्याची जबाबदारी देषातील नागरीकांवर येवून ठेपली आहे. याचे ज्वलंत उद्ाहारण देत देषाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये भरदिवसा महत्वाच्या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखीत घटना जाळल्या जाते, तसेच डॉ.बाबासाहेबांच्या निषेधार्थ वाक्य उच्चारल्या जातात त्याबध्दल लोकषाहीच्या आधारे निवडुण आलेेले व स्थापन झालेल्या केंद्र सरकारने कुठलीही कारवाई करण्याचे धाडस या प्रकरणी केले नाही. यापेक्षा मोठे दुर्देव ते कोणते अषी खंतही यावेळी माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी व्यक्त केेली. जागतीक स्तराबरोबरच देषात त्या विघातक शक्ती व मनुवाधी विचारांना संपविण्यासाठी पुन्हा बुध्दांच्या शांतीच्या विचारांची गरज आहे. ते पुढे म्हणाले कर्मयोगी स्व. तात्यासाहेब बोंद्रे यांच्या स्मृतीत 13 दिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेतले. त्यांच्या हयातीत बुध्दगया येथील बुध्दविहाराचे नामवंत भंते प्रज्ञाषिल यांचे चिखली येथे व्याख्यान आयोजित केले होते त्या कार्यक्रमाला हजारो बुध्द बांधवांची उपस्थिती होती. असे सांगुन इसोली येथील नागसेन बुध्दविहार परीसरातील समस्या जाणुन घेतल्या असल्याचे सांगुन त्या सोडविण्याकरीता आपण सदैव प्रयत्नषिल राहु असे ग्वाही यापसगी राहुलभाउ बोंद्रे यांनी दिली.  या कार्यक्रम प्रसंगी उपरोक्त मान्यवरांसह तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर, माजी न्यायधिष सुरेष घोरपडे, संतोष अवसरमोल, संतोष गवई सर, भारतीय बोध्द महासंघाचे जिल्हा संघटक राजेंद्र गवई, अषोक अवसरमोल, विलास सरदार, बोैध्दाचार्य विजु गवई, कुंडलीक गवई, जनार्दन सरदार, सुनिल गवई, अनिल वानखेडे, संजय खरात, इंगोले सर, बाबुराव सोनुने, वसंतराव अवसरमोल, खपके साहेब, विजय गिते, विकास शेळके, कडुलाला, तुकाराम गायकवाड, अबुभाई, रविंद्र लेखणार, नारायण कानडे, श्याम गिते,संजय रसाळ तथा असंख्य ग्रामस्थांसह बौध्द उपासक आणि उपासिका यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

0 9 3 7 4 3
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *