छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील भारतीय प्राचीन कला,साहित्य ,संगीत,नृत्य,शाहीरी,तबला वादक,हार्मोनियम वादक गायक इत्यादी क्षेत्रातील जे कलावंत वृद्ध झालेले आहेत, ज्यांनी भारतीय कला जोपासण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले आहे ,अशा कलावंताना वृद्धापकाळात उदर निर्वाह साठी शासन थोडे फार मानधन देते ज्यातून त्यांचा उदर निर्वाह होतो,सदरील प्रकरण राज्यातील पंचायत समिती मार्फत जि,प,च्या समाज कल्याण विभागातून मार्गी लागतात मात्र पंचायत समिती व जि,प,सुध्दा अशी प्रकरण मार्गी लावण्यात टाळाटाळ करते असेच प्रकरण वैजापूर प,स,मार्फत गेल्या १५वर्षांपासून प्रलंबित आहे,येथील जेष्ठ कलावंत तबला वादक फकिरराव विनायकराव विश्वासू हे २००९पासून मानधन मिळावे म्हणून सारखे प्रयत्न करीत आहेत,सर्व कागद पत्रांची पूर्तता करूनही गेल्या पंधरा वर्षापासून त्यांना कलावंतांचे मानधन नाही म्हणून येथील सेवा निवृत्त जवान गौतम अशोक गायकवाड व समाजकार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी दि.१६/३/२३ गुरुवार रोजी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी(प्रांत अधिकारी) माणिकजी आहेर यांना विश्वासू यांच्या वतीने निवेदन देऊन संबंधितास लोक कलांवत मानधन मिळावे म्हणून विनंती केली, प्रांत अधिकारी माणिकजी आहेर यांनी तात्काळ दखल घेत छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मीना यांना पत्र देऊन लोककलावंत मानधन अर्ज मंजूर करून नियमाप्रमाणे मानधन मंजूर करावे असे कळविले,संबंधित कलावंत विश्वासू यांनाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटण्याची सूचना केली,सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपुत यांनी शासनाकडे लोक कलावन्त यांची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्याची मागणी केली आहे,
Users Today : 1