छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर –जिल्ह्यातील वैजापूर ता,१६,दुसऱ्याच्या सुखी, समाधानी व आनंदी जीवनाला सकारात्मकतेने पाहणे हेच खरे सुखी जीवनाचे रहस्य होय असे प्रतिपादन महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार विजेते मुंबईचे मनोविकार तज्ञ डॉ,सचिन परब यांनी बुधवार(ता,१५)रोजी येथील सूरज लाँन्स मध्ये केले,येथील प्रजापिता ब्रह्माकुमारीजईश्वरिय विद्यालय द्वारे आयोजित “सुखी जीवन का रहस्य”या विषयावर ते बोलत होते, ते पुढे म्हणाले की,मनुष्य आपल्या जीवनात सदैव नकारात्मक विचारांच्या गाठी निर्माण करीत असतो,,मस्तिष्क मध्ये निर्माण झालेल्या या गाठी पुढे, पुढे हृदयाच्या रक्त वाहिन्यात सरकत जातात व हृदय रोग,रक्तदाब,मधुमेह सारखे आजार शरीरात निर्माण होतात,व दुःखी जगण्याला आरंभ होतो,या साठी आपल्या मनातील नकारात्मकता समूळ काढून टाका, दुसऱ्याचे भले चिंता, मनातील तेढ, दुर्गुण, वाईटपणा यांचे समूळ उच्चटन करा,सुख तुमच्याकडे आपोआप धावत येईल असेही डॉ,परब पुढे म्हणाले”ठेविले अनंते तैसेची रहावे ,चित्ती असू द्यावे समाधानी” परमेश्वराने जसे ठेवले तसेच रहाणे ,अधिकची लालसा न करणे हे ही सुखी जीवनाचे रहस्य आहे, असे ही डॉ,परब म्हणाले,या कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष सौ,शिल्पाताई
परदेशी यांनी केले, छत्रपती संभाजीनगरच्या प्रजापिता ब्रह्माकुमारीज विद्यालयाच्या प्रमुख बी,के, शीला दीदी,वैजापूर केंद्राच्या कमल दीदी,संजय पा,निकम,ठा, धोंडीरामसिंह राजपूत, डॉ,व्ही,जी,शिंदे, ऍड, आर,डी, थोट,ऍड,चंदने,विष्णू जेजुरकर, प्रेमसिंह राजपूत, राजू जोगीलाल राजपूत, लिमेश वाणी, विजय शिंगर, कराळे भाई,जोगीलाल राजपूत, अशोक धसे मुकुंद दाभाडे,यांच्या सह ग्रामीण भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,
Users Today : 1