नांदुरा प्रतिनिधी :- लग्नासाठी दबाव आणून मुलीला धमकावणाऱ्या तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल.नांदुरा शहरातील आरोपी तेजस गोरे वय अंदाजे २२ वर्ष, रा. वार्ड क्र. ०१ तथागत नगर, नांदुरा, ता. नांदुरा या मुलाचे तक्रारदार मुलीसोबत प्रेम संबंध होते,त्यानंतर काही काळाने मुलीने तेजसला सोडले.तरीही तेजस वारंवार त्याच्या प्रेयसीला संपर्क करुन माझ्या सोबत लग्न कर असा हट्ट धरत होता.तेजसला नाकारणारी प्रेयसी जेथे जाईल तेथे तिचा पाठलाग करुन, ब्युटी पार्लरवर जावुन तिला लग्नासाठी दबाव आणत असून तु जर का दुस- या मुलासोबत लग्न केले तर तूझे हातपाय तोडुन टाकिल अशी धमकि देत होता. यातच १५ मार्च रोजी सकाळी ११:३० वाजता फिर्यादीच्या मित्राने फिर्यादीला फोन करून सांगितले की तेजस व तुझे शारीरीक संबंध चालु असतांना तुझ्या भावाने पाहिले होते, त्यामुळे त्याने तुम्हाला मारहाण केली होती.तसेच तु, तुझी आइ व बहिनी अशा दिल्ली येथे शंभर शंभर रुपयांमध्ये शरीर विकतात अशी तेजस तुझी बदनामी करत आहे. यानंतर फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरून अप क्र. १८४/२०२३ कलम ३५४ (ड), ५००,५०६, भादवी नुसार १५ मार्च रोजी दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Users Today : 1