अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधी उपलब्ध उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

Khozmaster
2 Min Read

जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती महिलेला एका इंजेक्शन करीता भटकंती करावी लागत आहे गर्भवती रुग्ण महिलेला टी टी चे इंजेक्शन उपलब्ध करून द्या अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली होती

स्थानिक अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात औषधाचा अपुरा साठा असून गर्भवती रुग्ण महिलेला टी टी च्या इंजेक्शन करिता स्त्री रुग्णालयात भटकंती करावी लागत होती येथील परिचारिका गर्भवती रूग्ण महिलेला इकडच्या वार्डातून तिकडच्या वार्डात विचारपूस करण्याकरिता पाठवत आहेत परंतु गेल्या आठ दिवसापासून टि टी च्या इंजेक्शनचा औषधी साठा स्त्री रुग्णालयात उपलब्ध नाही वैद्यकीय अधीक्षका यांचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे सदर औषधीसाठी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी संबंधित डॉक्टर,परीचारीका व अधिकारी यांना संपर्क साधून विचारणा केली असता आणखी एक महिना सदर औषधी साठा उपलब्ध होणार नाही असे सांगण्यात आले होते स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधिक्षीका आरती कुलवाल यांचे दुर्लक्ष आहे हा औषधी साठा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावा, म्हणून उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांनी अपुऱ्या औषधी साठया करीता जबाबदार डॉक्टर,परीचारीका,व अधिकारी यांची आपले सरकार पोर्टल द्वारे जिल्हाधिकारी अकोला, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या कडे तक्रार केली होती औषधी साठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीची दखल घेत दिनांक २/३/२०२३ पासुन सदर टिडी औषधी साठा उपलब्ध झाला असून गरजु रुग्णांला त्याचा लाभ देण्यात येत आहे अशी माहिती अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय यांनी उमेश सुरेशराव इंगळे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवले असुन उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना यांच्या मागणीला यश आले

 

0 9 3 7 4 2
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *