आलेगाव जवळील पिंपलडोली येथील तीन घराला लागली आग

Khozmaster
2 Min Read

आगेत संपूर्ण घर जाळून झाले खाक

योगेश नागोलकार पातुर:- तालुक्यातील आलेगाव जवळील पिंपलडोली येथे आज अंदाजे १२ वा एक घराला आग लागली होती या आगीने दोन घराला सुद्धा आपल्या आटोक्यात घेतल्याने एकूण तीन घरे जाळून पूर्णपणे खाक झल्याची माहिती मिळाली आहे।मिळालेल्या माहितीनुसार आज १२ वा चे दरम्यान आलेगाव पासून जवळ असलेल्या पिंपलडोली येथील महादेव लक्ष्म अडगळे यांच्या घराला आग लागली ,या आगीने पाहतच रुद्र रूप धारण केले व जवळ असलेल्या महादेव लक्ष्म अडागळे यांच्या दोन्ही मुलांचे घराला पण या आगीने आपल्या तडाख्यात घेतल्याने,या आगीत जवळजवळ घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जाळून खाक झाले,या आगेला आटोक्यात आण्या साठी घरातील मंडळी व गावातील नागरिकांनी मदत केली परंतु आग आटोक्यात येय पर्यंत घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जाळले होते,या आगीत कोणतेही जीवित हानी झाली नाही परंतु परिवाराचा संसार आता उगड्यावर येऊन बसला आहे।ही आग शॉर्ट सर्किट मुळे झल्याची चर्चा आहे ,या आगीत संपूर्ण घर पूर्णपणे जळून खाक झाले आहे अंदाजे या कुटुंबायचे लाखोंचे नुकसान झल्याचे सांगण्यात येत आहेआलेगाव व आलेगाव पासून जवळ असलेल्या गावात उन्हाळ्यात अनेक वेळा आग लागली आणि या आगीत अनेक वेळा संपुर्ण घर पूर्णपणे जाळून खाक झाले या आधी आलेगाव पासून जावक असलेल्या मळसुर येथे उन्हाळ्यात मोठी आग लागली होती ज्या मध्ये मोठ्या प्रमाणावर घराचे व जनावरांच्या गोठयचे नुकसान झाले होते तरी आलेगाव व आलेगाव परिसरात एक तरी अग्निशमन वाहन उपलब्ध असावे असे नागरिकांचे म्हणणे आहे महसूल विभागाकडून तत्काळ पंचनामा गावामध्ये आग लागल्याची माहिती मिळताच तहसीलदार दीपक बाजड यांचे मार्गदर्शनाखाली तलाठी अमीत सबनीस यांनी पंचनामा करुण वरिष्ठांना सदर केला. पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरिक्षक गणेश महाजन यांनी आपल्या ताफ्यासह पाहणी करून पंचनामा केला.

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *