भरधाव ट्रकची बुद्ध महिलेस धडक महिला गंभीर जखमी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी

मूर्तिजापूर – शहर पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा पॉईंट चौकात भरधाव ट्रकने वृद्ध महिलेस जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झाल्याची घटना दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी चार साडेचार वाजता च्या दरम्यान घडली.प्राप्त माहितीनुसार दिनांक २५ मार्च रोजी सायंकाळी चार साडेचार वाजताच्या दरम्यान पंचफुला सुखदेवराव अंभोरे वय ७५ वर्ष राहणार वसंत नगर मूर्तिजापूर ही वृद्ध महिला आपल्या घराकडे जात असताना अमरावती कडून अकोल्याकडे भरधाव वेगाने जात असलेल्या टी एस ०८ यु बी २३६५ चा क्रमाकांच्या ट्रक चालकाने जबर धडक दिल्याचा अपघात झाल्याने वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली असल्याने महिलेला उपचाराकरिता तात्काळ अकोला रुग्णालयात रवाना करण्यात आले.नागरिकांच्या जमावाने रस्त्यावरील वाहने अडविली व पोलीस प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत नेहमी करिता वाहतुक नियंत्रक नियुक्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे शहर पोलिसांनी परिस्थिती हाताळून वाहतूक सुरळीत केली.शहर पोलिसांनी अपघातातील ट्रक ठाण्यात लावून कारवाई सुरू केली.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *