अकोला : जिल्हयामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा. तसेच मा. पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम 363, 366 (अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे.अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकुण 53 गुन्हे व 30 मिसिंग असे एकुण 83 प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलीस स्टेशन बोरगाव जिल्हा अकोला येथील अप क 320/22 कलम 363 भादंवी चा गुन्हा दाखल असुन प्रलंबित होता. गुन्हयाच्या तपासा दरम्यान मिळालेल्या माहीती नुसार पिडीत मुलगी हीचा शोध पुणे घेतला. सदर गुन्हयातील तपासादरम्यान गुप्तबातमीदारांकडुन माहीती मिळाली कि, पिडीत मुलगी व आरोपी हे अकोट येथे येथे राहत आहेत अश्या खात्रीलायक बातमी वरून आम्ही सोबत अमावा कक्ष।पोलीस स्टाफ असे शासकिय वाहनाने रवाना होवुन अकोट येथे गेलो व पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध।घेवुन पिडीत मुलगी व आरोपी हे तांदुळवाडी शिवारामध्ये मीळुन लाल्याने त्यांना ताब्यात घेवुन अ.मा.वा. कक्ष अकोला येथे आणले. पिडीत मुलीला विश्वासात घेवुन विचारपुस करण्यात आली व पूढील।कार्यवाही कामी पिडीत मुलीला व आरोपीला पो.स्टे बोरगाव यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली उपरोक्त कामगिरी ही पोनि श्री संजय खंदाडे, पोउपनि सुकेशनी जमधाडे, पोउपनि विजय खर्वे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, पोहेकॉ आशिष अघडते, मपोको पुनम बचे वाहन चालक नापोकॉ मनोज दुबे पोकॉ गणेश सोनोने पोकॉ गोपाल ठोंबरे यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसुन शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे
प्रतिनिधी अशोक भाकरे
अकोल खोज मास्टर न्यूज
Users Today : 18