मुर्तीजापुर येथील मनोज शर्मा बहुचर्चित हत्याकांड
प्रतिनिधी संतोष गवई अकोला /जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथील सन 2014 मध्ये घडलेल्या मनोज शर्मा हत्याकांडातील आरोपीला भादवि कलम 302 आणि 307 नुसार न्यायालयाने या सहा जणांना दिनांक 27 मार्च रोजी दुहेरी जन्मठेप शिक्षा सुनावली सोबतच दीड लाख रुपये दंड सुनावला आहे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव बबन वामनराव शितोळे गणेश वामनराव शितोळे नामदेव बबन शितोळे कपिल रतन शितोळे प्रमोद शेषराव चव्हाण आणि पंकज निलकंठ डोगरदिवे यांचा समावेश आहे व विजय अनंत लोकरे मोहम्मद रिजवान शेख इकबाल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले हकीकत अशाप्रकारे घडले की मूर्तिजापूर येथे अग्रेशन चौकात दिनांक 4 जून 2014 रोजी आठ जणांनी मिळून माजी नगरसेवक मनोज शर्मा वर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता मध्यस्थी करणारे राम जोशी या घटनेत जखमी झाले होते जखमी झालेल्या मनोज बन्सीलाल शर्मा यांना पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी राम मोहनलाल जोशी यांच्या तक्रार तक्रारीवरून 302 ३०७ २००१ २१२ १४७ १४८१४९ व आर्म कलमनुसार गुन्हा दाखल केला होता घटनेचा तपास उपविभागीय अधिकारी परविन मुंडे पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे गजानन पडघन यांनी दोषारोप न्यायालयात दाखल केले तृतीय जिल्हा सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयात सुनावणी झाली सरकार पक्ष द्वारे 17 साक्षी तपासण्यात आल्या सरकार पक्षाची बाजू अॅड आर आर देशपांडे यांनी मांडली न्यायालयाने मृत्यूच्या कुटुंबाला व जखमीला आर्थिक सहाय्य दिनाचा प्रस्ताव करण्याचा आदेश दिले
Users Today : 18