रामजन्मोत्सवा निमित्त भव्य आकर्षक देखाव्यासह शोभायात्रेचे आयोजन..

Khozmaster
1 Min Read

 

प्रतिनिधी मूर्तीजापुर दि.29/... तालुका . दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्रायीन हिंदी भाषीक समाज बहुउद्देशीय संस्था मूर्तीजापुर यांच्या वतीने रामजन्मोत्सवा निमित्त दि.30 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता श्रीराम मंदिर जुनी वस्ती पहाडीपुरा येथुन निघणार आहे.शोभायात्रेत विविध आकर्षक देखावे पाहण्यासाठी मिळणार आहे.ही शोभायात्रा श्रीराम मंदिर जुनी वस्ती पहाडीपुरा येथुन निघून पोळा चौक मार्ग परदेशीपुरा, बालाजी मंदिर, टांगा चौक, मोरारजी चौक, भगतसिंग चौक,सिंधी लाईन,रतन टाॅकीज,शिवाजी चौक,जयस्तंभ चौक,अग्रसेन चौक, विठ्ठल मंदिर,सराफा लाईन मार्ग स्टेशन विभागातील श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचा समापन होणार आहे.या शोभायात्रेत भव्य दिव्य आकर्षक देखाव्यासह ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे.यामध्ये महीला भजन मंडळ,रामधुन दिंडी,आदी सहभागी होणार आहेत.शोभायात्रे दरम्यान विविध ठिकाणी थंड पाणी,शरबत, मठ्ठा, आईस्क्रीम,नास्ता,आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.महाराष्टीय हिंदी भाषीक समाज बहुउद्देशीय संस्था मूर्तीजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेत समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद रामदास दुबे व रामजन्म शोभायात्रा समीती मूर्तीजापुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 3 7 3 7
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *