प्रतिनिधी मूर्तिजापूर,ता.२७ : पुस्तके मानवी जीवनात सकारात्मक परीवर्तन घडवून आणतात त्यामुळे माणूस पुस्तकांपासून दूर जात असलेल्या आजच्या काळात माणूस आणि पुस्तकांमधील अंतर कमी व्हावे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी आज येथे केले. अकोला जिल्हा ग्रंथालय संघाच्या येथील गाडगे महाराज विद्यालयातील प्रतिभा तिडके सभागृहात संपन्न झालेल्या २२ व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ सहकार नेते माजी आमदार ॲड.भैयासाहेब तिडके यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते. ज्येष्ठ मराठी समीक्षक व व्याख्याते डॉ.श्रीकांत तिडके, मुकूंद भारसाकळे, राजेश डांगटे, बाबुजी देशमुख वाचनालयाचे सचिव अनुराग मिश्र, स्तंभलेखक प्रा.डॉ.मोहन खडसे, दिवाकर गावंडे, सुषमा कावरे, कोकीळा वाहूरवाघ, राम मुळे, दिलीप सोळंके, अंजली कावरे उपस्थित होते. ॲड.भैयासाहेब तिडके यांनी अधिवेशनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ व कार्यकारी मंडळाचे अभिनंदन व कौतुक केले. पुण्यात संपन्न झालेल्या महाराष्ट्र ज्युनियर सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे मानांकन व लॉन टेनीस च्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल साना संजय खडसे हिचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अकोला जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष समाधान इंगळे यांनी केले. संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ यांनी आभार मानले. पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर,प्रमोद राजंदेकर, रामेश्वर चंद्रशेखर, संगम मोहोड,इ.उपस्थित होते.अध श्रध्दानिर्मुलन समितीचे सोळंके यांनी सामाजिक परिवर्तनाचे वादळ गाडगे बाबा या विषयावर मार्गदर्शन केले.निमंत्रितांचे कविसंमेलन कवी संदीप वाकोडे यांचे अध्यक्षतेखाली राजेद्र भटकर,प्रमोद पंत,रविंद्र जवादे,मिलींद इंगळे,बोबडे,पोहेकर,यांनी रचना सादर केल्या, अण्णा वाहुरवाघ,राजकुमार डोंगरे, ब्रीजलाल डोंगरे, भीमराव इंगळे, रविंद्र डोंगरे, समाधान पाटील राहूल इंगळे, संजय देशमुख, देवानंद वानखडे, राजपाल वर्घट, शरद लोखंडे,प्रणव तालोड यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 18