
प्रतिनिधी रामेश्वर वाढी आलेगाव :-येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी निमित्त गावामधून भव्य मिरवणूक टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आली यावेळी मिरवणुकीमध्ये प्रभु श्रीराम, लक्ष्मण, माता सिता, वीर हनुमान, माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, यांची वेशभूषा बालकांनी केली होती त्यांची घोड्यावरून तसेच रथा मधून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील माता भगिनींनी ठीकठिकाणी पूजन केले तरुणांनी उत्साहात स्वागत केले यावेळी गावातील अबालवृद्धापासून सर्वांचा उस्पूर्त सहभाग पाहण्यास मिळाला. पिंपळखुटा येथील टाळकरी मंडळी तसेच गंड्यार वादक यांनी मिरवणुकीला मंत्रमुग्ध केले. समस्त गावकरी मंडळी यांनी उत्साहात सहभाग घेत रामनवमी साजरी केली.दुपारी एक ते चार महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.महाप्रसादाचे व सुंदर मिरवणुकीच्या नियोजनाचे नागरिकांनी कौतुक केले.
Users Today : 22