श्री रामनवमी दिनी ३२ मन सुवर्ण सिंहासन खडा पहारा अभियान

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :- श्री रामनवमीच्या पवित्र दिनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे रायगड किल्ल्यावर निर्माण करण्यात येणाऱ्या ३२ मन सुवर्ण सिंहासनासाठी पातूर तालुक्यातील तरूण धारक-यांनी रायगडावर खडा पहा-यासाठी बनविण्यात येणाऱ्या यादीत आपल्या रक्ताच्या अंगठ्याचा ठसा द्यावा यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडे त्यांचे नावे स्वच्छेने नोंदविण्यात यावी म्हणून श्री रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर पातूर येथे सुरवात करण्यात आली त्यानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी त्याप्रकारचे बॅनर लावण्यात आले. या अभियानात नाव नोंदणीसाठी पातूर येथील धारकरी विजय राऊत व सुहास देवकर यांच्याशी संम्पर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.  अभियानाचा शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी धारकरी विजय राऊत,सुहास देवकर,पै.सुरेश श्रीनाथ,पै.मंगेश गाडगे,मधुकर उगले,ठा.शिवकुमार बैस,गजानन गाडगे,ह.भ.प.लक्ष्मन बारताशे, विनोद तेजवाल,डॉ.विलास हिरळकार,मधुकर राखोंडे,पुष्कराज कढोणे,कार्तिक डिके,प्रफुल्ल तायडे,महेश तायडे,चक्रधर माळी,विठ्ठल डिके,उदय गवळी,छगन कराळे,संजय गोतरकार,चैतन्य राऊत, सतिश वानखडे,अथर्व गाडगे,गोलू खंडारे,निखिल तायडे,प्रमोद श्रीनाथ,जीवन राऊत,अनिल श्रीनाथ,उगले महाराज व आदी शिवभक्त धारकरी उपस्थित होते.

 

 

0 9 3 7 4 1
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *