
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर :– पातूर शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे या शहराला श्री संत नानासाहेब महाराज तथा श्री संत हजरत शहाबाबू या नावाने शहराची ओळख असून पातूर तालुक्यातील आराध्य दैवत म्हणून संत श्री सिदाजी महाराज आहे पातुर शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाते येथे सर्व धर्मीय एकता दिसून येते येथे श्री संत सिदाजी महाराज यांच्या सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी होते तेथे भव्य दिव्य अशी गुढी उभारून सप्ताहाची सुरुवात होते या सप्तानिमित्त तालुक्यातील हजारो भाविकांची दहा दिवस गर्दी होत असते या सप्ताहात मंदिरामध्ये दहा दिवस हरिपाठ,कीर्तन,प्रवचनाचे, कार्यक्रम होत असतात त्यामुळे पातुर शहरातील वातावरण अगदी भक्तिमय झाले होते या मंदिरात व मंदिरातील परिसरामध्ये महिला भक्त पूजा अर्चना कीर्तन तसेच प्रवचन इत्यादी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला 31 मार्च राम नवमी च्या दुसऱ्या दिवशी यात्रेचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा मंदिरातील परिसरामध्ये दहीहंडी, पावली, भजन,कीर्तन इत्यादी कार्यक्रम झाले संध्याकाळच्या वेळी पारंपारिक पद्धतीने जी चंदनाची पालखी भोई समाजाचे श्री जानकीराम इंगळे यांनी 1972 मध्ये श्री सिदाजी महाराज यांना अर्पण केली होती त्याच पालखीत आज पर्यंत श्री सिदाजी महाराज यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक निघते शेवटी मंदिरात पालखीची सांगता होते या पालखी मिरवणुकीत महिलांनी पावली नृत्य सादर केले त्यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते
या यात्रेदरम्यान श्री संत सिदाजी महाराज विश्वस्त मंडळ यांच्याकडून संध्याकाळी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन केल्या होते यामध्ये जवळपास 70 क्विंटल चा महाप्रसाद होता यामध्ये तालुक्यातील जवळपास 25000 भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या महाप्रसादाच्या कार्यक्रमासाठी श्री सिदाजी महाराज व्यायाम शाळेचे युवक तसेच मंगेश गाडगे मित्रपरिवार यांनी अथक परिश्रम घेतले सदर यात्रेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हरीश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कडे कोट बंदोबस्त होता.
Users Today : 22