जिल्हयामधून CCIT मूर्तिजापूर च्या विदयार्थ्यांनी मारली बाजी

Khozmaster
1 Min Read

मुर्तिजापुर – MOM परीक्षा हि MKCL द्वारा वर्ग ५ ते ९ च्या विद्यार्थ्यांकरीता शालेय अभ्यासक्रमावर आयोजित केली होती. हि परीक्षा पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने CCIT मूर्तिजापूर येथे डिसेम्बर मध्ये पार पडली होती. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय विविध रोख बक्षिसे MKCL द्वारा व शाळा स्तरावरील बक्षिसे CCIT मूर्तिजापूर द्वारा जाहीर केली होती. या नुसार जिल्ह्यातून प्रथम आल्याबद्दल २५००/- रु, द्वितीय क्र. १५०० व तृतीय क्र. १०००/- रु बक्षीस एकूण ७ विद्यार्थ्यांनी पटकावले. तसेच शाळा स्तरीय बक्षिसे सुद्धा शाळेतच देण्यात आली. यात शहरातील जवळपास सर्वच शाळांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. जिल्ह्यात एकूण १५ बक्षिसे होती त्यातील ७ बक्षिसे CCIT मूर्तिजापूर येथून प्रविष्ट विद्यार्थ्यांनी बक्षीसे पटकावली. सर्व विद्यार्थी, पालक व शाळेचे मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका व शिक्षकांचे खूप अभिनंदन CCIT चे संचालक अमोल सोनुने यांनी केले.

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *