पातूर येथे श्री कान्होबा यांचा भंडारा व महाप्रसाद संपन्न प्लास्टिक मुक्ती व शून्य कचरा व्दारे भंडारा साजरा

Khozmaster
3 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातुर /नगरीत मध्यभागी श्री कान्होबा चे मंदिर आहे कान्होबा चौकामध्ये दरवर्षी प्रमाणे यंदापन सोमवार रोजी बारसला भंडारा निमित्य महाप्रसादाचे आयोजन राखोंडे परिवाराने केले होते. विशेष म्हणजे की साने गुरुजी मंडळ पातुर व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान तसेच स्वामी विवेकानंद युवती मंडळ,पातुर व्दारे या भंडाऱ्यामध्ये प्लास्टिक मुक्त व शून्य कचरा भंडारा व महाप्रसादाचे आयोजन करून त्यामध्ये केळीचा पानावर व स्टील चा गिलास उपयोग करुन सर्वांनी प्लास्टिक मुक्त व कचरा मुक्त भंडारा व पारंपारिक भजन व भोजन करुन अनोखा उपक्रमाने साजरा केला.पातूर शहरातील मध्यभागी असलेला कान्होबा चौक या चौकाला ज्या नावाने ओळखले जाते किंवा ओळख निर्माण झाली ते म्हणजे श्री कान्होबा यांच्या मंदिरा मुळे कारण की चौकामध्ये एका कोपऱ्यावर खूप वर्षा पूर्वी पासून एका दगडाच्या ढिगार्‍यावर चेहरा नसलेली भव्य मूर्ती व इतर नक्षिदार दगळ ठेवलेली होती. तीन दशका अगोदर जिथे मंदिर आहे ती जागा श्री नामदेवराव मोतीरामजी राखोंडे (गुरुजी) यांनी विकत घेतली ते शिक्षक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याने मूर्ती विषयी पातूर शहरातील विविध वयोवृद्ध नागरिकांन पासून जुनी माहिती गोळा केली व तिथे इसवीसन पूर्वी मध्ये गायकी तसेच गवारी लोक राहत असुन त्यांचे दैवत असलेले श्री कान्होबा म्हणजेच भगवान श्री.कृष्णाचे मंदिर होते. कालतराने ते नाहीसे झाले. बाकी होती ते फक्त चेहरा नसलेली मुर्ती होती त्यामुळे स्वतः हाताने बाळ कृष्णाचा श्री कान्होबाचा चेहरा राखोंडे गुरुजी यांनी स्वतः हाताने बनवून रंगरंगोटी करुन मूर्ती पूर्ण केली व त्यांनी श्री कान्होबा चे नामकरण करुन ज्या दगडाच्या ढिगार्‍यावर पहिले मूर्ती होती त्याच ठिकाणी आपल्या जागेत कोपरावर चार बाय चारच्या चौकड्या मध्ये स्वखर्चाने मंदिर बांधले आणि पुढे त्याच मंदिरामुळे या चौकाचे नाव हे कान्होबा चौक म्हणून लोक ओळखु लागले त्यानंतर श्री कान्होबा यांच्या कृपेने ना.मो.राखोंडे (गुरुजी) यांनी स्वखर्चाने दरवर्षी अष्टमीला दहीहंडीचा प्रसाद व चैत्र किंवा वैशाख या महिन्यातील बारसला उळदाची डाळ व भाकरीचा भंडारा व महाप्रसादाची सुरवात केली आणि ते आज पर्यंत चालु असून सन २०२१ ला श्री कान्होबा मंदिराचे जिर्णोद्धारा करिता स्व.विनायक राखोंडे स्मृती प्रित्यर्थ व श्री गणेशोत्सव व प्रतिष्ठाणाला मिळालेल्या पुरस्कारातून एक लाख एक हजार एकशे एक रुपये रक्कम मधून भव्यदिव्य व नक्षिदार मंदिर बांधकाम करुन श्री नामदेवराव मोतिरामजी राखोंडे (गुरुजी) यांच्या हस्ते उदघाटन करुन देवाच्या चरणी अर्पण केले. आता राखोंडे गुरुजी हे वयोवृद्ध झाले असून त्यांचा हा वारसा त्यांचे मुले किशोर, विशाल व सागर राखोंडे हे नित्यनियमाने दरवर्षी श्री कान्होबा यांचा भंडारा मोठ्या उत्सवात साजरा करत आहेत.

 

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *