सतत वर्षभर सेवा देणा-यांचा ग्रामस्थांनी कडून सत्कार

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर : –पातूरचे ग्रामदेवता संत श्री सिदाजी महाराज मंदिरात वर्षभर प्रामाणिकपणे सेवाभावी वृत्तीने झटणारे ह.भ.प.श्री.लक्ष्मण बारताशे व संगित शिक्षक सुहास देवकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने संत सिदाजी महाराज मंदिरात विशेष सत्कार करण्यात आला.  बारताशे महाराज हे या मंदिरात वर्षभर नित्यनेमाने भजन,स्त्रोत्र पारायण आणी आरती व्यवस्था यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात.तसेच यात्रा महोत्सवात दहा दिवस विविध पुजाविधी मध्ये ही हिरीरीने भाग घेवून भाविकांचा आनंद द्विगुणित करतात.  संगित शिक्षक सुहास देवकर यांच्या माध्यमातून परिसरातील अनेक शालेय विद्यार्थी,विद्यार्थीनींना संगिताचे मोफत धडे देवून त्यांना विविध प्रकारच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार करतात.अशा दोन्ही व्यक्तींचा आदर व सन्मान ग्रामस्थांच्या वतीने संत श्री सिदाजी महाराज मंदिरात संत श्री सिदाजी महाराज यांचे वंशज रामा भाऊ माहोकार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सत्कार कार्यक्रम प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष रामदास खोकले,यात्रा पंचमंडळाचे अध्यक्ष महादेवराव गणेशे,युवा उद्योजक शिवकुमार बायस,सुधाकर उगले, सुरेश फुलारी,दगडू लोथे,गणेश वडतकार,विनोद वडतकार,अमोल काळे,नारायण भाकरे,विठ्ठल डिके,डॉ विलास हिरळकार,मधुकर राखोंडे,कार्तिक डिके,जय देवकर, सतिश वानखडे सह शहरातील इतर भाविक भक्त उपस्थित होते.

 

 

0 9 3 7 4 2
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *