आलेगाव येथे छ शिवाजी चौकात दोन सख्ख्या भावांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना दि. २९ मार्च रोजी घडली होती. या हल्ल्यात चेतन श्यामराव काळदाते व दीपक श्यामराव काळदाते हे दोघे भाऊ गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान चेतन श्यामराव काळदाते याचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला .चान्नी पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आलेगाव येथील आरोपी गणेश प्रल्हाद धात्रक, महादेव प्रल्हाद धात्रक, दिपक प्रल्हाद धात्रक यांचे वर मारहाणीचा गुन्हादाखल केला होता. गंभीर जखमी दोघा भावांवर उपचार सुरू होते. दि. ३ एप्रिल रोजी चेतन काळदाते या युवकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी चान्नी पोलिसांत हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ती प्रक्रिया पोलिसांनी लवकर करावी यासाठी नातेवाईकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.आरोपीवर गुन्हे दाखल तर आरोपी मोकाट कसे असे अनेक प्रश्न नातेवाईकांनी एस डी पी ओ यांना केले.दरम्यान प्रकरण गंभीर असून आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल आहे तर आरोपी मोकाट कसे अश्या प्रतिक्रिया नागरिकांनी पोलिसांना व्यक्त केल्या पोलिसांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत कार्यवाहीचे करत असल्याचे सांगितले.गावात तणापूर्ण वातावरण चेतन काळदाते यांच्या मृत्यू प्रकरणामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने ४ एप्रिल रोजी बाळापूरचे उपविभागीय अधिकारी यांनी भेट देऊन आरोपींना लवकरच अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मृतकाचे नातेवाईक शांत झाले.हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पूर्वीच्या गुन्ह्यात जामिनावर आहे. त्यामुळे न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपींना अटक करण्यात येईल.गोकुळ राज, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापूर चेतन काळदाते यांच्या मृत्यूप्रकरणी जीवघेणा हल्ल्यासह हत्येच्या गुन्ह्यात वाढ केली असून, आरोपी अटक करण्याची प्रक्रिया सुरु आहे.. आरोपींना अटक करण्यात येईल.योगेश वाघमारे, ठाणेदार पोलिस स्टेशन, चान्नी
Users Today : 23