प्रतिनिधी रामेश्वर वाढी/ स्थानीक शिवनगर येथील संत गजानन महाराज समाज मंदिर येथे श्री रामनवमी व ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मोफत औषधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमी सामजिक उत्सव समिती शिवनगर चे युवा अध्यक्ष यश देशमुख यांनी केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष यश देशमुख,उद्घाटक भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे,प्रमुख अतिथी नगरसेवक अनिल गरड, भाजपा महानगर जिल्हा सरचिटणीस संजय जिरापुरे,शिवसेना नेते निलेश उर्फ पिंटू भाऊ वानखडे, शिवसेना नेते बबलूभाऊ उके, भाजपा नेते कपिलभाऊ बुंदेले,संभाजी ब्रिगेड तथा मातोश्री प्रतिष्ठान महानगर अध्यक्ष योगेशभाऊ ढोरे, सामाजिक कार्यकर्ते राजू बूंदेले, अभिषेक परळकर, शिवसेना नेते रवी देशमाने,शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाल नागपुरे, सत्यासाई सेवा समिती जिल्हा अध्यक्ष किशोर रत्नपारखी,गजानन गोलाईत होते.आरोग्य शिबिरात सेवा देणारे हृदयरोग तज्ञ डॉ अंकुश तोष्निवाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ नरेंद्र सरोदे, नेत्ररोग तज्ञ डॉ प्रदीप अग्रवाल, दंतरोग तज्ञ डॉ स्मिता शाह सत्य साई सेवा समितीचे मांडवे काका, रविंद्र गोडे यांचा सत्कार मान्यवरांचे वतीने करण्यात आला. शिबिराला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या शिबिरात ५०० चे वर रुग्णांची तपासणी करण्यात येऊन मोफत औषोधोपचार करण्यात आले.शिबीर यशस्वी करण्यासाठी राजू बुंदेले,अभिषेक परळकर,शुभम जामोदे, संदिपभाऊ वानखडे,तूषार पडोळे, जय देशमुख, योगेश चंदेल, रवी देशमाने, संदिप गोतमारे, वैभव वैद्य, अमित काकडे, अतूल पत्रे, मयूर मावळे, शुभम बेंदरकर, डी आर गवई, मोहनराव देशमुख यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 1