रूग्णसेवक संदीप चव्हाण याने घडविले माणुसकीचे दर्शन

Khozmaster
2 Min Read

महाराष्ट्र राज्य रूग्णसेवक संघटनेच्या भोसरी विधानसभा अध्यक्ष असलेल्या पातूर तालुक्यातील सती आसोला येथील संदीप चव्हाण याचा रात्री एक वाजता मोबाईल वाजला…त्यानी तो फोन उचलला… समोरून एका व्यक्तीने त्याला सांगितले की माझ्याकडे कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगाराचा अपघात होवून एका पायातील मांडीच्या हाडाचे दोन तुकडे झाले आहे खासगी रुग्णालयात उपचारासाठी डाॅक्टरांनी रूपये दोन लाख खर्च सांगितले आहे त्याची परिस्थिती जेमतेम असल्याने तो खर्च त्याला न झेपावणारा आहे तसेच तो उत्तरप्रदेश चा रहिवासी असल्याने त्याचे कुणी नातेवाईक पुण्यात नाही त्यामुळे आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्याला कशी मदत होईल याबाबत विचार करावा अशी त्यानी चव्हाण याला विनंती केली त्यानीही त्याच्या मित्राला मदतीसाठी होकार दिला व त्याचे मार्गदर्शक असलेले शिवकुमार बैस यांना तात्काळ या विषयीची सविस्तर माहिती अवगत करून दिली.बैस यांनी चव्हाण यांना त्या अपघातग्रस्त शेहरे आलम वय वर्षे २० यास ताबडतोब पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले व तेथील डॉक्टरांशी संपर्क करून त्या रूग्णावर व्यवस्थीत उपचार करण्यासाठी विनंती केली.संदीप चव्हाण यांनी त्याचवेळी त्या रूग्णाला रूग्णालयात उपचारासाठी दाखल करून तेथील तज्ञ डॉक्टर यांच्याकडून त्याच्या तुटलेल्या मांडीच्या हाडाची ताबडतोब यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून घेतली. आठवडाभर त्या रूग्णास डिस्चार्ज मिळेपर्यंत त्याला पाहिजे असलेली सर्व प्रकारची मदत केली त्याचे रूग्णालयाच्या संपूर्ण बिलातून ऐंशी टक्के बिल आमदार महेश लांडगे यांच्या शिफारस पत्राद्वारे माफ करून उर्वरित संघटनेच्या कार्यकर्त्यानी भरले.उपचार पुर्णपणे झाल्यावर त्याला त्याच्या उत्तरप्रदेश येथील गावी जाण्यासाठी रेल्वेतील आरक्षित डब्यात व्यवस्थीत सोय करून देण्यात आली. रूग्णांची दिवस रात्र निस्वार्थ पणे सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असणा-या अशा संदीप चव्हाण सारख्या अवलियाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे मत पातूर तालुका विकास मंचाचे अध्यक्ष तसेच रूग्णसेवक संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले शिवकुमार बैस यांनी व्यक्त केले आहे. संदीप चव्हाण यांच्याबद्दल बोलताना शेहरे आलम म्हणाला की जाती भेद विसरून ओळख नसताना अनोळखी व्यक्तीला माणुसकीचे दर्शन देवून निस्वार्थपणे सेवा देणारे लोक आजही या भूतलावर जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्यासारख्या गरीब गरजूंना घाबरण्याचे काहीच कारण नाही असे सांगून त्याचे डोळे पाणावून त्याच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहू लागल्या.

 

 

0 9 3 7 4 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *